crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नवी मुंबई येथील ऐरोलीत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मुख्याध्यापिकेने सार्वजनिकपणे रागावल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोप तिच्या पालकांनी केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव अनुष्का शहाजी केवळे असे आहे. ती ऐरोलीतील सुशिलाबाई देशमुख विद्यालयात दहावी या वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या या टोकाच्या निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तुझं प्रमोशन करतो, पगार वाढवतो, त्या बदल्यात मला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस
का रागावली मुख्याध्यापिका?
काही दिवसांपूर्वी शाळेत परीक्षेचे पेपर सुरु होते. त्यावेळी अनुष्काच्या बेंचखाली कॉपीची एक चिठ्ठी आढळून आली. यावरून मुख्याध्यापिकांनी तिला सर्व विद्यार्थ्यांसमोर अपशब्द वापरात अपमानित केले. या प्रकरणाने मानसिक तणावात अनुष्का होती. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल
या घटनेची गंभीर दखल घेत रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थी व पालक वर्गात संतापाची लाट उसळली असून मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन; नेरूळ पोलिसांची कारवाई
नवरात्रोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, काही मंडळांनी ध्वनी मर्यादेचे नियम पाळले नाहीत. याच पार्श्वभूमीवर नेरूळ पोलिसांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. नेरूळ सेक्टर 16/18 मधील दोन मंडळे, सीवूड्स सेक्टर 23 मधील एक आणि नेरूळ सेक्टर 30 मधील एका मंडळावर ही कारवाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत वाजवण्यात आलेल्या डीजे आणि साऊंड सिस्टीममुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी नेरूळ पोलिसांकडे केल्या होत्या.
नियमांचे उल्लंघन
प्रशासनाने नवरात्रोत्सवापूर्वी सर्व मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की,मंडळांनी पोलीस, अग्निशमन, विद्युत विभाग आणि महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या घ्याव्यात. ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांनुसार ठरवलेल्या वेळा आणि आवाजाची डेसिबल मर्यादा ओलांडू नये. रात्री 10 नंतर डीजे, बँड किंवा कोणताही मोठा साऊंड वापरण्यास मनाई आहे. तरीही काही मंडळांकडून या नियमांचे पालन झाले नाही. आवाजाची तीव्रता ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे मोजमापानंतर पोलिसांनी नोंदवले.
या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून चार मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत निर्धारित मर्यादा ओलांडल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.
प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी