Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 18 कोटींना घातला गंडा

लक्ष्मी रस्त्यावरील एका प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाची १८ कोटींची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणात एका दुकानातील कामगाराचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात तिघांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 27, 2026 | 11:16 AM
धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; 'तो' मेसेज आला अन्...

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; 'तो' मेसेज आला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील एका प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाची १८ कोटींची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणात एका दुकानातील कामगाराचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात तिघांना अटक केली आहे. दुकानातील दागिने परराज्यातील एका महिलेला देऊन ही फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. प्रशांत कांतीलाल बर्मेचा (वय ६१, रा. कोंढवा), रमाकांत महादेव पराळे (वय ६२, रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) आणि मधु उर्फ महेश्वरी रमाकांत पराळे (वय २२, रा. केडगाव अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. यामध्ये परराज्यातील महिलेवर देखील गुन्हा नोंदवला आहे. ही महिला फरार असून, तिला अद्याप अटक केलेली नाही. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त (अतिरीक्त कार्यभार) विवेक मासाळ तसेच पोलिस निरीक्षक राम राजमाने, सहाय्यक निरीक्षक कल्याणी सरोदे व त्यांच्या पथकाने केली आहे.

संबंधित प्रसिद्ध व्यावसायिक यांचे लक्ष्मी रस्त्यावर मोठे सराफी दुकान आहे. या दुकानात प्रशांत बर्मेचा हा काही वर्षांपासून काम करत होता. दरम्यान, तक्रारदारांनी आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण केले. तेव्हा १२ किलो ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७२ लाख रुपयांचा फरक येत असल्याचे समोर आले. अधिक चौकशीत त्यांना १८ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकारानंतर तक्रारदारांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.

खंडणी विरोधी पथक दोनचे पोलिस निरीक्षक राम राजमाने यांच्या पथकाने तपास सुरू केल्यानंतर रमाकांत याच्या घरात छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी प्रशांत बर्मेचा व रमाकांत या दोघांना पकडले. पोलिसांनी रमाकांत याच्या घराची झडती घेतली असता तेथून ५ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये एका कारसह तसेच दागिने व रोकड आहे. प्रशांत हा गेल्या दीड वर्षांपासून रमाकांत व इतर आरोपींसोबत अहिल्यानगरमध्ये राहण्यास आहे. पोलिसांकडून आता उर्वरित दागिने व रोकड यासंदंर्भात तपास सुरू करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : उन्हाच्या तडाख्यामुळे महावितरणचा मोठा निर्णय; वीज खंडित होण्यापासून दिलासा

Web Title: A famous jeweler in pune has been cheated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
2

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
3

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
4

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.