
दोन कारखानदारात जोरदार हाणामारी
शिरोली : शिरोली औद्योगिक वसाहतीत दोन कारखानदारात जोरदार हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (दि.18) दुपारी बाराच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, रोहित बोडके (रा. कोल्हापूर) व अमर पाटील (रा.पुलाची, शिरोली) या दोघांचे शिरोली औद्योगिक वसाहतीत कारखाने आहेत.
रोहित बोडके हे आपल्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील दत्त फौंड्री कंपनीकडे फॉर्च्युनर गाडीने चालले होते. ते कंपनीच्या जवळ आले असता अमर पाटील हे रस्त्यावर आपली दुचाकी बाजूला थांबवून फोनवर बोलत थांबले होते. त्यावेळी रोहित बोडके यांनी अमर पाटील यास गाडी बाजूला लावून बोला म्हणत आपल्या कंपनीजवळ पोहोचले. रोहित बोडके हे आपल्या कंपनीजवळ पोहोचताच अमर पाटील हे त्यांच्या पाठोपाठ पोहोचले. मी रस्त्याच्या बाजूला बोलत थांबलोय, तुम्हाला काय अडचण आहे का? अशी विचारणा केली असता रोहित बोडके यांनी आपल्या कंपनीतील कामगारांना बोलावून अमर पाटील यांना मारहाण केली.
हेदेखील वाचा : Navi Mumbai Crime: चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड
दरम्यान, अमर पाटील यांना मारहाण झाल्याचे समजताच त्यांचे साथीदार दत्त फौंड्रीमध्ये आले असता त्यांनी रोहित बोडके यांना कंपनीमध्ये घुसून मारहाण केली व त्यांच्या फॉर्च्युनर गाडीची मोडतोड केली. या घटनेची माहिती समजताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमर पाटील व रोहित बोडके यांनी परस्परविरोधी फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार तक्रार दाखल झाली आहे.
अल्पवयीन विद्यार्थिनीवर तरुणाचा हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, नागपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेननंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी संध्याकाळी घडली.
हेदेखील वाचा : Uttar Pradesh Crime: जबरदस्तीने किस करण्याचा केला प्रयत्न; एक्स प्रेयसीने तरुणीच्या जिभेचे केले तुकडे; नेमकं प्रकरण काय?