चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड
एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार पाटोळे, बोराटे, धर्माधिकारी, चव्हाण हे गस्त घालत असताना, एका इसमाने दुचाकी ठोकल्याचे दिसून आले. बीट मार्शलने त्याच्याजवळ चौकशी केली असता पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळाली नाही. अशातच दुचाकी वर नंबर प्लेट नसल्याने गस्त पथकाचा त्याच्या वरचा संशय बळवला. त्यामुळे दुचाकीस्वारास पथकाने अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. ठोकलेल्या दुचाकीचा चेसी नंबर वरून माहिती काढली असता, ही दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीने चोरीची कबुली दिली आहे. आरोपीकडून एपीएमसी हद्दीतील 1 रिक्षा व 2 दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली. आरोपी संतोष रवींद्र इंगळे, वय 25 वर्ष, राहणार कोपरी गाव, याला अटक केली आहे. आरोपी हा देखील रिक्षा चालक असून मागील तीन वर्षापासून तो रिक्षा चालवत आहे. आरोपी हा फक्त मौज मजेसाठी वाहनांची चोरी करत होता. तर त्याच्यावर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नवी मुंबई पोलिसांनी चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या एका चोराला अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख रुपयांचे दागिनेही जप्त केले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा धूर्त चोर गुन्हे केल्यानंतर विमानाने परत येतो. पोलिसांच्या खुलाशानंतर, या अनोख्या चोराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की आसामचा रहिवासी असलेला हा चोर एक कुशल गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १२ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीने एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) मध्ये एकूण ३३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.






