Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड हादरलं! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार

कुरकुंभ (ता. दौंड) मधून साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 17, 2025 | 11:43 AM
दौंड हादरलं! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार

दौंड हादरलं! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार

Follow Us
Follow Us:

दौंड : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता दौंडमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. कुरकुंभ (ता. दौंड) मधून साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथून एका साडेपाच वर्षीय मुलीचे दिनांक १६ रोजी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्गावरील भागवत वस्ती येथील योगेश भागवत यांच्या किराणा दुकानासमोरून अपहरण केले. त्यानंतर त्या मुलीला मळद (ता. दौंड जि. पुणे) या गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अनन्या हॉटेलच्या अलीकडील उसाच्या शेतात नेहून तिला मारहाण करत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी स्थानिक नागरिकांना मुलीचा आरडा ओरड करत असलेला आवाज ऐकू आल्याने त्यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन पुढील भयानक प्रकार रोखला. नराधम आरोपी नवनाथ चंद्रकांत रिठे (शेरेचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक नागरिकांनी वेळीच नराधमाला पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरिक्षक मीरा मटाले करीत आहेत.

Web Title: A five and a half year old girl was kidnapped and molested in daund taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Daund Crime

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.