Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त

छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंचांची निर्घृण हत्या झाली. ग्रामसभेतील ठरावानंतर आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त करण्यात आले. प्रकरणात ४ आरोपी अटकेत असून तणाव कायम आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 24, 2025 | 09:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जमिनीच्या वादातून माजी सरपंचांची निर्घृण हत्या
  • ग्रामसभेच्या ठरावानंतर आरोपींचे अवैध दुकान बुलडोझरने पाडले
  • एकाच कुटुंबातील ११ जणांचा सहभाग; ४ आरोपी अटके
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथील ओहर गावात माजी सरपंचांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. जमिनीच्या वादातून हा धक्कदायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याच प्रकरणामुळे मंगळवारी ओहर ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा बोलावली होती. ज्यामध्ये गावकऱ्यांनी मुख्य आरोपीच्या मनमानी कारभाराविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. या सभेत सर्वसंमतीने ठराव मंजूर करून आरोपींचे गावातील मुख्य चौकात असलेले अवैध दुकान आणि अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले.

Mumbai Crime: मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई! GST विभागाचा अधीक्षक 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

 

अतिक्रमण केलेले अवैध दुकान

आरोपींनी गावाच्या मुख्य चौकात अतिक्रमण करून दुकान थाटले होते. या दुकानात दररोज टवाळखोर मुलांचा वावर असायचा. यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सामोरे जावे लागत होते. यामुळे गावात दहशतीचे वातावरण होते. हत्येच्या घटनेनंतर गावकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवत जमीनदोस्त केला.

आणखी ४ आरोपींना बेड्या

या हत्याकांडातील मुख्य आरोपीसह आणखी काही आरोपी ताब्यात होते. तर त्यातून काही आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी यातून चार आरोपींना अटक केली आहे. जमीर इनायत पठाण, मोईन इनायत पठाण, फुर खान अजगर खान पठाण आणि अस्लम खान उर्फ गुड्डू गयाज खान पठाण असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नावे आहे. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजार केले असता, न्यायालयाने त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरपंचाच्या हत्येमागे ११ जण

माजी सरपंचाची हत्या एकूण ११ जणांनी मिळून केली होती. जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांनी मिळून माजी सरपंचाचा काटा काढला. या घटनेनंतर ओहर गावात तणावाचे वातावरण आहे. पोलीस फरार असलेल्या इतर उर्वरित आरोपींचा शोध घेत आहे.

मोठी बातमी! यशवंत बँकेवर ED ची रेड; एकाच वेळी 5 ठिकाणी छापे, 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार…

💡

Frequently Asked Questions

  • Que: माजी सरपंचांची हत्या का करण्यात आली?

    Ans: जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांनी मिळून हत्या केल्याचे तपासात समोर आले.

  • Que: ग्रामस्थांनी कोणती कारवाई केली?

    Ans: विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर करून आरोपींचे अवैध दुकान पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले.

  • Que: सध्या पोलीस कारवाई काय आहे?

    Ans: ४ आरोपी अटकेत असून त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: A former sarpanch was brutally murdered near chhatrapati sambhaji nagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर
1

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर

देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश
2

देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.