Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोक्का’तील गुंडाची पुण्यात दहशत, हॉटेलची तोडफोड; चालकाकडे मागितली खंडणी

एका गुंडाने साथीदारांसोबत धानोरीत दहशत माजवत हॉटेलची तोडफोड केली आहे. हॉटेल चालकाला शिवीगाळ करून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 20, 2025 | 02:45 PM
‘मोक्का’तील गुंडाची पुण्यात दहशत, हॉटेलची तोडफोड; चालकाकडे मागितली खंडणी

‘मोक्का’तील गुंडाची पुण्यात दहशत, हॉटेलची तोडफोड; चालकाकडे मागितली खंडणी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहरात शेकडो टोळ्यांवर “मोक्का” कारवाई केल्यानंतर त्यातून गेल्या पाच वर्षात ८ गुंड जामीनावर बाहेर आले असताना यातील एका गुंडाने साथीदारांसोबत धानोरीत दहशत माजवत हॉटेलची तोडफोड केली आहे. हॉटेल चालकाला शिवीगाळ करून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या टोळक्याने व्यवस्थापकासह मालकाला मारहाण केली. याप्रकरणी आता पोलिसांनी गुंडासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सराइत गुंड रोहन अशोक गायकवाड, गणेश राठोड यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हॉटेल चालक अन्सार गफूर शेख (वय ३२, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहन गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे, मारामारी, तसेच खंडणी मागणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो विमानतळ आणि येरवडा परिसरात गुन्हेगारी करत होता. २०२२ मध्ये विमानतळ पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर गायकवाड आणि साथीदार येरवडा कारागृहात होते. गायकवाडने याप्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळविला. तो बाहेर आला. नंतर गायकवाड व साथीदारांनी पुन्हा धानोरीत दहशत माजविली सुरुवात केली होती.

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गायकवाड आणि साथीदार धानोरी जकात नाका परिसरातील हॉटेल अमिरमध्ये जेवण करण्यास आले. यावेळी तेथे काही तरुण जेवण करत होते. गायकवाड आणि साथीदारांनी हॉटेलमधील ग्राहकांना शिवीगाळ करुन त्यांच्याशी भांडणे सुरू केली. हॉटेल मालक अन्सार शेख यांनी भांडणे सोडवून गायकवाड आणि साथीदारांना बाहेर जाण्यास सांगितले. गायकवाड आणि साथीदार तेथून निघून गेले.

हे सुद्धा वाचा : पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा; वर्षभरात भरला 90 कोटींचा दंड; तब्बल बारा लाख…

काही वेळेनंतर गायकवाड आणि साथीदार पुन्हा हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेल मालक शेख यांना शिवीगाळ करुन हॉटेलमध्ये तोडफोड सुरू केली. हॉटेलचे व्यवस्थापक शरीफ शेख यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. शरीफ जखमी झाले. मालक अन्सार यांना धक्काबुक्की करुन त्यांना धमकी दिली. हॉटेल सुरू ठेवण्यासाठी दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. सहायक निरीक्षक सचिन धामणे तपास करत आहेत. पसार झालेल्या गायकवाड आणि साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात डॉक्टर तरुणीची क्लिनिकमध्येच आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

Web Title: A gangster has vandalized a hotel by creating terror in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पत्नीच्या अफेअरचा संशय आणि पतीने लढवली अजब शक्कल, थेट चप्पलमध्ये लावला GPS ट्रॅकर अन् असे पकडले रंगे हात
1

पत्नीच्या अफेअरचा संशय आणि पतीने लढवली अजब शक्कल, थेट चप्पलमध्ये लावला GPS ट्रॅकर अन् असे पकडले रंगे हात

Eknath Shinde: “निवडणुका संपल्या आता पक्ष वाढीवर भर द्या”, एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना निर्देश
2

Eknath Shinde: “निवडणुका संपल्या आता पक्ष वाढीवर भर द्या”, एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना निर्देश

Nashik News : शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा; मार्च, एप्रिल महिन्यात ५७ हजार हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त
3

Nashik News : शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा; मार्च, एप्रिल महिन्यात ५७ हजार हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त

St Bus: एसटीचे अकार्यकारी अधिकारी मोकाट, प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवट, श्रीरंग बरगे यांचा आरोप
4

St Bus: एसटीचे अकार्यकारी अधिकारी मोकाट, प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवट, श्रीरंग बरगे यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.