Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कात्रजमधील ‘त्या’ हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल; पोलीस दलात चर्चांना उधाण

कात्रजमधील एका हुक्का पार्लरबाबतचा स्मरणपत्राचा एक मॅसेज सध्या पोलीस दलात प्रचंड व्हायरल होत आहे. स्मरणपत्राच्या मॅसेजमध्ये ६ वेळा हुक्का पार्लरबाबत तक्रार करूनही तो सुरूच आहे, असा आरोप केला जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2024 | 06:19 PM
कात्रजमधील 'त्या' हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल; पोलीस दलात मेसेज प्रचंड व्हायरल

कात्रजमधील 'त्या' हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल; पोलीस दलात मेसेज प्रचंड व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : पुणे शहरातील अवैध धंद्याबाबत तंबी देऊन अन् ६५ जणांची उचलबांगडी केल्यानंतर देखील त्यांची जागा आता नव्या वसूलीदारांनी घेतली आहे. परिणामी अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असून, कात्रजमधील एका हुक्का पार्लरबाबतचा स्मरणपत्राचा एक मॅसेज सध्या पोलीस दलात प्रचंड व्हायरल होत आहे. स्मरणपत्राच्या मॅसेजमध्ये ६ वेळा हुक्का पार्लरबाबत तक्रार करूनही तो सुरूच आहे, असा आरोप केला जात आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्याभरापुर्वीच येथे कारवाई केली होती. तरीही तो हुक्का पार्लर सुरू असल्याचे सांगितले जाते. तत्पुर्वी नुकताच कात्रजमधील तीन पत्ती जुगारावर छापा मारून भारती विद्यापीठ पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे शहरातील अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असल्याचे दिसते.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज तलावाजवळील एका वॉशिंग सेंटरमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर चालविला जात आहे. त्याबाबत एका कॉमन मॅनने याबाबत कंट्रोल, स्थानिक पोलीस आणि पोलीस आयुक्तांना याची माहिती दिली होती. तसे स्मरणपत्रात तारखेनुसार माहिती दिली आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर त्यावर कारवाई देखील केली. परंतु, पुन्हा तो हुक्का पार्लर सुरू आहे, असा मॅसेज व्हायरल झाला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाकडून भारती विद्यापीठ पोलिसांना ‘मेसेज’ दिला आहे, असे उत्तर मिळाले मात्र, पुढे काहीच झालेले नाही, असा आरोप देखील यात केला आहे. दरम्यान, या हुक्का पार्लरबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळविल्यानंतर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हंटले आहे.

कात्रज तलावाजवळील हुक्का पार्लरवर यापूर्वी कारवाई केलेली आहे. संबंधित तक्रारदाराकडून करण्यात येणाऱ्या तक्रारीत तथ्य नसल्याचे दिसून येते. तसेच, त्यांच्या तक्रारीबाबतही शंका उपस्थित होते.

– दशरथ पाटील (वरिष्ठ निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे)

कात्रजमधील जुगार अड्ड्यावर छापा

आंबेगाव पोलिसांनी कात्रज परिसरात एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी याप्रकरणी जुगार अड्ड्याच्या चालकासह १६ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून मोबाइल, जुगार खेळण्याचे साहित्य, रोकड असा १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्ड्याचा चालक किशोर सातपुते (रा. दांडेकर पूल), साहिल इब्राहिम साठी (रा. धनकवडी), किरण डिंबळे, रोहिदास गोरड (दोघे रा. पर्वती) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार बालाजी पांचाळ यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करत आहेत.

Web Title: A letter regarding a hookah parlor in katraj has gone viral in the police force nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 06:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले
1

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले
2

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले

Pune crime: आईने अनैतिक संबंध ठेवले मुलाने व्यक्तीचा केला खून ! थरारक घटना
3

Pune crime: आईने अनैतिक संबंध ठेवले मुलाने व्यक्तीचा केला खून ! थरारक घटना

शनिवारवाडा ते स्वारगेट भूमिगत रस्त्याला ‘ब्रेक’; सार्वजनिक बांधकाम नव्हे तर पुणे महापालिकेवर जबाबदारी; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
4

शनिवारवाडा ते स्वारगेट भूमिगत रस्त्याला ‘ब्रेक’; सार्वजनिक बांधकाम नव्हे तर पुणे महापालिकेवर जबाबदारी; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.