Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटणमधील कारखान्यात भीषण आग; तब्बल लाखो रुपयांचं नुकसान

पाटण तालुक्यातील मरळी (दौलतनगर) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 24, 2025 | 06:06 PM
पाटणमधील कारखान्यात भीषण आग; तब्बल लाखो रुपयांचं नुकसान

पाटणमधील कारखान्यात भीषण आग; तब्बल लाखो रुपयांचं नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

पाटण : पाटण तालुक्यातील मरळी (दौलतनगर) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कारखान्याची रेकॉर्ड रूम आणि शेती ऑफिस पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

मल्हारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले आणि महिला पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शेळके पोलीस फौजफाट्यासह रविवारी दिवसभर आगीच्या कारणाचा शोध घेत होते. याबाबत मल्हारपेठचे ठाणे अंमलदार माने यांनी माहिती दिली. देसाई साखर कारखान्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कारखान्याच्या गव्हाणवाडी बाजूकडून शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली, तरी कारखान्याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली रेकॉर्ड रूम आणि शेती ऑफिस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच संपला आहे.

अग्निशमन दलास केले पाचारण

आग लागल्याचे रात्री कामावर असलेल्या सुरक्षारक्षकांना समजताच, त्यांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यांनी तातडीने हालचाल करून, कराड नगरपरिषद, सह्याद्री कारखाना, जयवंत शुगर आणि सातारा येथील अजिंक्यतारा कारखान्याच्या अग्निशमन दलास पाचारण केले. देसाई कारखान्याच्या अग्निशामक बंबासह ४ ते ५ अग्निशामक बंबांच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. कराड व सातारा येथील अग्निशामक बंब यायला वेळ लागल्याने आग तत्परतेने शमवण्यात यश आले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस तपासात काही संशयास्पद आढळल्यास गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. कारखान्याच्या आजूबाजूला शेती आहे. त्यातील गवताला आग लागली होती. ही आग पसरून, कारखान्याच्या आतील बाजूस लागली असावी. आमचा तपास अजून सुरू आहे. कोणी हेतुपुरस्सर हे कृत्य केले आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.

– चेतन मछले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मल्हारपेठ.

Web Title: A major fire has broken out at the marli factory in patan nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Patan News
  • Satara News
  • Satara Police
  • Shambhuraj Desai
  • Sugarcane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
1

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण
2

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…
3

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
4

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.