
अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई (Photo Credit - X)
आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी
राखी गणेश मुरमुरे (२६, रा. वरणगाव, जि. नांदेड), तुषार निवृत्ती आगळे (३१, रा. पुंडलिकनगर) आणि अमोल लक्ष्मण इंगळे (३०, रा. हनुमान नगर, पुंडलिकनगर) अशी अटके करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील राखीविरुद्ध सिटी चौक, क्रांती चौक ठाण्यात गुन्हे दाखल आहे. या तिन्ही आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक आयुक्त अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर हे उपस्थित होते.
हे देखील वाचा: विवाहित महिला घराबाहेरील बाथरूममध्ये गेली अन्…; देवरुखमध्ये घडली भयंकर घटना
अशी झाली कारवाई
प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ प्रतिबंध शाखेला माहिती मिळाली होती की, एका कारमधून नगर रोड परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री होणार आहे. त्यानुसार नगर नाका ते तिसगाव फाटा दरम्यान सापळा रचून संबंधित कार (एमएच-२०-एफयू-०६१५) थांबविण्यात आली. तपासणीदरम्यान राखी मुरमुरे, अमोल इंगळे आणि तुषार आगळे यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, दामिनी पथकाच्या कांचन मिरधे व त्यांच्या पथकाने केली.
गावठी कट्ट्यासह काडतूसही सापडले
आरोपींकडून ८०३ रुपये किंमतीच्या ९९ नायट्रोसेन कंपनीच्या १० गोळ्या, एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे तसेच नोटांचा एक बंडल जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे जप्त करण्यात बंडलच्या वरच्या बाजुने आणि खालच्या बाजुने मिळून केवळ ५ हजार रुपयांच्या नोटा खऱ्या आहेत. बाकीच्या ९ लाख ९५ हजार रुपयांच्या नोटा या बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे हा नोटांचा बंडल राखीला कोणी दिला?, तिनेही तो कशाला घेतला?, हा बंडल राखी आणखी कोणाला देणार होती? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा: ब्रेडमध्ये लपवून कोकेनची तस्करी; मुंबईतील नायजेरियन महिलेला बंगळुरूमध्ये अटक