Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाइलवर एक मॅसेज पाठवला अन्…; पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस

शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची तब्बल ४३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 02, 2025 | 01:41 PM
मोबाइलवर एक मॅसेज पाठवला अन्...; पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस

मोबाइलवर एक मॅसेज पाठवला अन्...; पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची तब्बल ४३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ४६ वर्षीय व्यावसायिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार व्यावासायिक कात्रज भागातील आंबेगाव खुर्द परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एक मॅसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. व्यावसायिकाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. तेव्हा चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यांत त्यांनी वेळोवेळी ४३ लाख ५० हजार रुपये गुंतविले.

पैसे गुंतविल्यानंतर त्यांना परतावा मिळाला नाही. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले तपास करत आहेत.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक

गेल्या काही दिवसाखाली ऑनलाइन काम देण्याच्या आमिषाने महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला नऱ्हे येथे राहते. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. सोशल मिडीयावर पोस्ट, व्हिडीओ व ग्राफिक्स याला व्ह्यू मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी महिलेला प्रथम एक काम दिले. ते पुर्ण केल्यानंतर महिलेला सुरुवातीला पैसेही दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. नंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने १० लाख २६ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा न देता तिची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.

Web Title: A man has been cheated in pune with the lure of investing in the stock market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • Arrested News
  • cmomaharashtra
  • crime news
  • Pune Police Action
  • Pune Police News

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
1

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
2

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
4

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.