
धक्कादायक ! जावयाने गळा दाबून केली सासऱ्याची हत्या; मृतदेह लपवण्यासाठी थेट पुलाखालीच...
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता संपत्तीच्या वादातून जावयाने आपल्या सासऱ्याची हत्या केली आणि पुरावा लपवण्यासाठी पुलाखाली सिमेंटच्या पिलरमध्ये लपवले. ही घटना रविवारी (दि. ११) कोकणागड मार्गावर उघडकीस आली.
किशोर धर्मा कंगाळे (वय ६५, रा. भंडारा, ह.मु. कोकणागड) असे मृतचे नाव तर जावई अमित रमेश लांजेवार (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आणि अमित यांच्यात संपत्तीवरून अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. जावयाच्या भीतीने किशोर मागील आठ महिन्यांपासून कोकणागड येथील पुतणे मंगेश कंगाळे यांच्या घरी राहत होते. घटनाक्रमानुसार, 9 जानेवारीला किशोर दुचाकीने शेताकडे निघाले होते. पण परत आले नाहीत. काही वेळाने त्यांची दुचाकी रस्त्याच्या काठावर बेवारस अवस्थेत आढळली, तर शेताजवळ त्यांच्या कागदपत्रे व कपडे पसरलेले होते.
हेदेखील वाचा : Bihar Crime : क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या; तरुणीचे अपहरण, जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले, नंतर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार
दरम्यान, किशोरचे मित्र, सुनील चौधरी यांनी सांगितले की, किशोर गायब होण्यापूर्वी त्यांनी फोन करून सांगितले होते की, त्यांचे जावई आणि एक व्यक्ती त्यांना रस्त्यात थांबवून मारपीट करत आहेत आणि त्यानंतर कॉल कट झाला. नातेवाईकांनी याप्रकरणी कारधा पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली होती. पोलिस तपासात रविवारी (दि. ११) किशोर यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरील पुलाखाली सिमेंटच्या पायलीत आढळला.
पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न; गुन्हा दाखल
तपासात, आरोपी जावई अमित लांजेवार आणि त्याचा साथीदार यांनी किशोरला रस्त्यात थांबवून मारहाण केली आणि नंतर गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कारधा पोलिस ठाण्यात हत्येच्या आणि षडयंत्राच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला. पोलिस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी यांनी, दोन पोलिस पथक आरोपींच्या शोधासाठी पाठिवल्याचे सांगितले. परंतु अद्याप अमित लांजेवार आणि त्याचा साथीदार पोलिस ताब्यात आले नाही.
हेदेखील वाचा : West Bengal Crime : आधी हत्या करायचा, नंतर मृतदेह पाण्याने धुवून खायचा…., बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर