फोटो सौजन्य: Gemini
याच दरम्यान गायकवाड याने शिंदे सेनेची वाटही धरली होती. तो ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे गायकवाड किती चलाख राजकारणी होता हे आता स्पष्ट होत आहे. मात्र नर्तिका दिपाली पाटीलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने त्याची रवानगी पोलिस कोठडीत झाली.
Crime News : नांदेडमध्ये कत्तलीसाठी गोवंश वाहतूक; गुन्हे शाखा पोलिसांची थेट कारवाई
दिपाली आणि तिचा पती काही वर्षापासून एकमेकांपासून दूर राहत होते. दिपालीला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघे माध्यमिक शिक्षण घेत आहेत. त्यांचा सांभाळ आजी करत होती मात्र सगळा कुटुंबाचा भार दिपालीच पेलत होती. दिपालीच्या मृत्यूमुळे ती दोन लेकर पोरकी झाली आहेत. त्या कुटुंबाच्या पुढे उदरनिर्वाहाच प्रश्न निर्माण झाला असून यासंदर्भात मदतीचा हात पुढे करण्यासाठी कोणी धजावले नाही. मात्र तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्या निरनिराळ्या पक्षात काही काळासाठी असल्यावरून राजकारण सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक संदीप गायकवाड याने उमेदवारी मिळविण्याचा चंग बांधला होता. त्याने शिंदे सेनेची वाटही धरली होती. शिवसेनेच्या उमेदवारांसोबतचा एक फोटो सोशल मेडीयात व्हायरल होत आहे. असे असले तरी संदीप गायकवाड याची पत्नी लता गायकवाड यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक लढविली; निवडणूक प्रचार यंत्रणेत माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा देखील सहभागी होता; त्यामुळे गायकवाड कोणत्या पक्षात आहे? हे सिद्ध होते.
गायकवाड कोणत्या पक्षाचा ? याही पेक्षा आत्महत्या करणाऱ्या नर्तिका दिपाली पाटील हिच्या आईने पोलिसात दिलेली तक्रार आणि त्यानुसार दाखल झालेला गुन्हा लक्ष वेधणारा आहे. दिपालीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाचा आधारवड हरपला आहे.






