Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अबूबकर कॉलनी परिसरात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचा स्कार्फने गळा दाबून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2026 | 12:34 PM
अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:
  • अमरावतीच्या अबूबकर कॉलनीत विवाहितेचा खून
  • पत्नीचा स्कार्फने गळा आवळल्याचा पतीवर आरोप
  • गाडगेनगर पोलिसांनी आरोपी पतीला केली अटक
अमरावती : गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अबूबकर कॉलनी परिसरात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचा स्कार्फने गळा दाबून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील मृत महिलेचे नाव नसरीन बानो रफीउल्लाह खान पठाण (वय ४८) असे असून, आरोपी पती रफीउल्लाह खान हाफिजुल्लाह खान पठाण (वय ४८) याला गाडगेनगर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले आहे.

 

मृत महिलेचा भाऊ सय्यद साजिद अली (अचलपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती आपल्या पत्नीचा सतत छळ करत होता. मृत महिलेच्या नावावर असलेला भूखंड विकून तो स्वतःच्या नावावर हस्तांतरित करत असे. याशिवाय तो तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे आणि तिने घर सोडल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. सोमवारी घर बंद असल्याची माहिती मिळाल्यावर कुटुंबीयांनी घरात जाऊन पाहिले असता नसरीन बानो पलंगावर मृत अवस्थेत आढळली.

हे सुद्धा वाचा : वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त

पोलिसांची धडक कारवाई 

घटनेची माहिती मिळताच मृत महिलेच्या भाच्याने व भावाने गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ खुनाचा गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने हलवली. पोलिस आयुक्त राकेश ओला व उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दीपाली राऊत आणि त्यांच्या डीबी पथकाने अवघ्या आठ तासांच्या आत आरोपी पतीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय राऊत करत आहेत.

हे सुद्धा वाचा : छळामुळे विवाहितांच्या आत्महत्येच्या दोन घटना, पुण्यात खळबळ; दोन्ही पतींना अटक

१६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला

मोबाईलवर ठेवलेल्या ‘King Is Back’ या स्टेटसच्या कारणावरून तळेगाव दाभाडे येथे एका १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी चौक परिसरातील कपड्याच्या दुकानात घुसून तीन जणांनी या मुलावर कोयत्याने वार केले आहेत. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित अल्पवयीन मुलाने काही महिन्यांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि सुधारगृहातून बाहेर आलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत फोटो काढला होता. त्यानंतर त्याने ‘King Is Back’ असे स्टेटस मोबाईलवर ठेवले होते. या स्टेटसमुळे पूर्वीच्या हत्येच्या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या मित्रांमध्ये नाराजी निर्माण झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. याच रागातून संबंधित मुलावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनाक्रम याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अमरावतीतील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अबूबकर कॉलनी परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत महिला आणि आरोपी पतीचे नाव काय आहे?

    Ans: मृत महिलेचे नाव नसरीन बानो रफीउल्लाह खान पठाण (वय ४८) असून, आरोपी पतीचे नाव रफीउल्लाह खान हाफिजुल्लाह खान पठाण (वय ४८) आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपी पतीला किती वेळात अटक केली?

    Ans: गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी पतीला अवघ्या आठ तासांत अटक केली. कौटुंबिक वाद, पत्नीवरील संशय आणि भूखंडाच्या कारणावरून छळ झाल्याची तक्रार मृत महिलेच्या भावाने दिली आहे.

Web Title: An incident has occurred in amravati where a husband murdered his wife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!
1

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त
2

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह
3

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह

दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई
4

दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.