
सोन्याच्या आमिषाने एकाला गंडा; तब्बल 52.50 लाख नेले अन् नंतर...
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात फसवणुकीच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता कमी किमतीत सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून अमरावतीच्या दोन जणांना मुंबई आणि दिल्लीला नेऊन 52.50 लाख रुपयांनी फसवल्याची घटना उघडकीस आली आहे.
शुभम अनिलराव सोनोने (पलास लाईन, अमरावती) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी रामेश्वर पेटले आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सोनोने गाडगेनगरमध्ये मोबाईल फोनचे दुकान चालवतात. महेंद्र शुक्ला दुकानात काम करतो. महेंद्रचा ओळखीचा रामेश्वर पेटले दुकानात आला. त्याने कस्टम विभागापेक्षा कमी किमतीत सोन्याचे दागिने घेतले असल्याचे सांगितले. तसेच ‘तुम्हाला जर हवे असेल तर माझ्यासोबत मुंबईत या’, असे म्हटले.
हेदेखील वाचा : Kolhapur Crime: कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कहर! चुटकी वाजवत भूतबाधा काढतो मांत्रिक, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, शुभमने त्याचा मित्र राजेंद्र आहुजा याला कळवले. या दोघांमध्ये व्यवहार झाला. 17 एप्रिलला ते संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. ते ३५ लाख रुपये रोख घेऊन गेले होते. रामेश्वर पेटले यांनी पैशांनी भरलेली बॅग टॅक्सीच्या मागील ट्रंकमध्ये ठेवली. शुभम आणि राजेंद्र यांनी वारंवार बॅग पुढे आणण्यास त्यास सांगितले, परंतु त्यांना अनेक कारणे देण्यात आले. त्यांनी एका मोकळ्या जागेत टॅक्सी थांबवली. ड्रायव्हर आणि पेटले टॅक्सी घेऊन पळून गेले.
ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ९९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.