कोल्हापूर: कोल्हापुरातून अंधश्रद्धेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चुटकी वाजवून भूतबाधा काढण्याचा प्रयत्न होतांना या व्हिडिओत दिसत आहे. एवढेच नाही तर स्मशानभूमीत अघोरी पूजा. करणीचे देखील प्रयोग होत आहे. या व्हिडीओने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. याआधी देखील अंधश्रद्धेचे अनेक प्रकार समोर आले होते. समोर आलेल्या व्हिडीओ हा कोल्हापूर शहरातला असल्याचे सांगितलं जात आहे.
Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू
व्हिडिओत काय?
या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की काही लोक गळ्यात माळा घालून तंत्र मंत्र करत आहेत. महिलांवर मंत्रोच्चार करत अघोरी प्रकार सुरु आहेत. तर स्मशानभूमीत नारळ फोडून त्या ठिकाणी फोटोवर करणीसारखे प्रकार केले जात आहेत. महिलाना फसवून सगळे प्रकार करत असल्याची गुप्त चर्चा आहे. इतकंच नाहीतर एका महिलेला पळवून नेल्याची व्हायरल चर्चा आहे. . त्यामुळे पोलिसांनीही हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळायाला हवं असं कोल्हापूरच्या नागरिकांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी शिरोली येथील स्मशानभूमित अघोरी प्रकाराची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर उदगाव, कुरुंदवाड, इंगळी, मुडशिंगी आणि इतरही काही गावामधील स्मशानभूमीत अघोरी पूजा झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. आता चुटकी वाजवून भूतबाधा दूर करणाऱ्या भोंदू बाबाचा व्हिडीओ वायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
लाच घेताना तलाठी सापडले रंगेहात; इचलकरंजीमध्ये कायदा सुव्यवस्ठा धाब्यावर
वारसा नौद करण्यास गट खुला करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना शहापुर येथील तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले. गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२ रा. मगदुम कॉलनी जयसिंगपूर) असे तलाठ्याचे नाव असून नेताजी केशव पाटील (वय ४५ रा. म्हसोबा रोड दर्गा गल्ली शहापुर) असे कोतवालचे नाव आहे. स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तक्रारदाराने वारस नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात कागदपत्रे दिली होती. कागदोपत्री नाव नोंदणीसाठी तक्रारदार शहापूरचे तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होते. या नोंदीसाठी गट नं. ७२९ हा ब्लॉक असलेला गट खुला करण्यासाठी कोतवाल पाटील याने तलाठी सोनवणे यांच्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती तक्रारदाराने सुरुवातीला १० हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते. तर लाच मागितल्याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर ३ नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने कोल्हापुर लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात शहानिशा केली होती. गुरुवारी स्टेशन रोडवरील गुरु चित्रमंदिर नजीकच्या चहा टपरीवर तक्रारदाराकडुन १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांना पथकाने रंगेहात पकडले.
Pune Crime: पुणे हादरलं! मित्रांनीच व्यावसायिक मित्राला गोळीवबार करत संपवलं; कारण काय?
Ans: कोल्हापूर
Ans: तंत्र-मंत्र
Ans: पोलीस






