Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात एकाचा डोक्यात बांबू घालून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

अनैतिक संबंधांना विरोध केल्याने जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2025 | 04:08 PM
पुण्यात एकाचा डोक्यात बांबू घालून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

पुण्यात एकाचा डोक्यात बांबू घालून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामारी, दरोडे यासारखे गुन्हे उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज भागातील गुजरवाडी परिसरात अनैतिक संबंधांना विरोध केल्याने जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना अटक केली आहे. मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, गुजरवाडी रस्ता, मांगडेवाडी, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२), केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघे रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज) यांना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या नात्यातील एका महिलेचे आरोपी रोहित याच्याशी अनैतिक संबंध होते. रोहित रिक्षा चालवायचा. नंतर त्याने प्रवासी वाहने भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला. मनोहर यांनी अनैतिक संबंधांना विरोध केला होता. यावरुन त्यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी रात्री रोहित व त्याच्याबरोबर असलेले दोन ते तीन साथीदार कात्रज भागातील पवारनगर भागात आले. रोहित, केशव आणि साथीदारांनी शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात बांबू घातला.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शिंदे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेला आरोपी रोहितला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार केशव याला बीडमधील गेवराई परिसरातून ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत.

Web Title: A man was murdered in pune for opposing immoral relations nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.