
प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहितेची हत्या, धारदार शस्त्राने चिरला गळा (Photo Credit- X)
प्रकरणात मृत सुनंदा शिवाजी वाघमोडे (रा. डी सेक्टर, एन-१२ हडको) हिची मावशी शारदा बाबासाहेब वाहुळ यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, सुनंदा व शुभम यांच्यात घटनेच्या पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यापूर्वी शुभमने प्रेमाचे आमिष दाखवून सुनंदाला पळवून नेल्याची तक्रारही तिच्या नातेवाईकांनी हसूल पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, दोघांचे परस्पर संमतीने संबंध असल्याने कारवाई करण्यात आली नव्हती.
दरम्यान, काही महिन्यांपासून दोघे एन-१२ हडकोतील सिद्धार्थनगर परिसरात एकत्र राहत होते. मात्र, शुभमला दारूचे व्यसन असल्याने तो सुनंदाचा छळ करीत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून सुनंदाने शुभमला सोडून आपल्या दोन मुलांसह एन-१२ हडको येथे किरायाने राहत होती. तरीही शुभम तिचा पाठलाग करत वारंवार त्रास देत होता, ६ डिंसेबर २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शुभम सुनदाच्या घरी गेला. तिने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात शुभमने कटरने सुनंदाचा गळा चिरुन हत्या केली.
Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल
तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक सी. व्ही. दुबे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता अरिवंद बागुल यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात आरोपीच्या हाताचे ठसे, मृत सुनंदा हिचा गळा २७ सेमी, कट झालेला होता, तर कटरची अर्धी ब्लेड गळ्यात अडकलेली असल्याची डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. विशेष म्हणजे खून करुन पळतांना आरोपीला पाहणाऱ्या तीन साक्षीदार महिला फितूर झाल्या. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.