काय घडलं नेमकं?
चरण रायमल हा २७ वर्षीय युवक शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरामध्ये असतांना काही अज्ञात दुचाकीवर आले आणि त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात चरण रायमल या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
KRK Firing Incident: मुंबईत गोळीबाराचा थरार! अभिनेता केआरके पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडल?
अज्ञात आरोपींचा शोध सुरु
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
जालन्यात नात्याला काळीमा! मामानेच अल्पवयीन भाचीवर दोन वर्षे केले लैंगिक अत्याचार, मामींचाही सहभाग
जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाने आपल्या अलपवयीन भाचीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा घृणास्पद प्रकार मामाने आपल्या पत्नीच्या साहाय्याने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हि माणुसकीला काळिमा फासणारी घटना तब्ब्ल दोन वर्षांपासून पिडीतेसोबत सुरु होती. पीडितेने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मामाच्या विरोधात आणि मामीच्या विरुद्ध शारीरिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे असून आरोपी मामाला अटक केली आहे.
काय घडलं नेमकं?
पोलिसांच्या तपासानुसार, कौटुंबिक वादातून पीडितेच्या आईने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर महिलेने दुसरं लग्न केलं. त्यावेळी महिलेच्या दुसऱ्या पतीपासून तिच्या मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला होता आणि यामुळेच १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या घरी राहू लागली. पीडितेच्या मामाने दोन वर्षणापासुन दारूच्या नशेत तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर अल्पवयीन पीडिता कशीबशी आरोपीच्या घरातून पळून तिच्या वडिलांजवळ पोहोचली. पीडितेने घडलेली घटना तिच्या आजीला सांगितलं. तिच्या आजीने आणि तिने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना या प्रकरणी तक्रार देण्यात आली.
Ans: जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात.
Ans: चरण रायमल, वय 27 वर्षे.
Ans: अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून शोध मोहीम सुरू आहे.






