Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्याने लुटले; जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली

संशयितांनी विद्यार्थ्यांच्या बॅगांची झडती घेऊन त्यातील रोख रक्कम काढून घेतली. तसेच ध्रुव देवरे नावाच्या विद्यार्थ्यांचा महागडा 'आयफोन' बळजबरीने हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता, भामट्यांनी विद्यार्थ्यांना इमारतीखाली नेऊन पुन्हा मारहाण केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2026 | 12:10 PM
जावई धोंडे जेवायला गेले अन् लाखाचा ऐवज विसरून आले; दुकानदाराला समजताच पर्स केली परत

जावई धोंडे जेवायला गेले अन् लाखाचा ऐवज विसरून आले; दुकानदाराला समजताच पर्स केली परत

Follow Us
Follow Us:

नाशिक : कॉलेजरोड जवळील विसेमळा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. रूम पार्टनर असलेल्या विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवत आणि बेदम मारहाण करत एका टोळक्याने सुमारे ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ध्रुव वाघ, दुर्गेश पाटील, दिवेश पाटील आणि मनी पाटील या संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील मूळ रहिवासी असलेला गौरव ज्ञानेश्वर महाजन (वय १८) हा तरुण त्याचे मित्र ध्रुवम देवरे, प्रेम पाटील आणि प्रज्वल मालपुरे यांच्यासह शिक्षणासाठी नाशिकमध्ये आला आहे. हे सर्वजण विसेमळा भागातील ‘निर्मल रत्न अपार्टमेंट’ मध्ये भाड्याने खोली घेऊन राहतात. गेल्या शुक्रवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास हे सर्व विद्यार्थी रूमवर असताना ही घटना घडली. ‘आम्ही कार्तिक देवरेचे मित्र आहोत’ असे सांगून संशयित टोळक्याने घरात प्रवेश केला. परवा तुमच्यासोबत जो जाड मुलगा होता, तो आम्हाला पाहिजे आहे, असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना दमदाटी सुरू केली. विद्यार्थ्यांनी त्या मुलाला बोलावण्यास नकार दिला असता, संशयितांनी चाकूचा धाक दाखवत विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

“मला माझ्या पत्नीपासून वाचवा”, पिडित पतीची पोलीसांकडे विनवणी; बाॅयफ्रेंडला घरात न घेतल्याने बायको मुलांना घेऊन फरार

दरम्यान, संशयितांनी विद्यार्थ्यांच्या बॅगांची झडती घेऊन त्यातील रोख रक्कम काढून घेतली. तसेच ध्रुव देवरे नावाच्या विद्यार्थ्यांचा महागडा ‘आयफोन’ बळजबरीने हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता, भामट्यांनी विद्यार्थ्यांना इमारतीखाली नेऊन पुन्हा मारहाण केली आणि मोबाईल परत पाहिजे असल्यास २५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत खंडणी मागितली.

दुचाकीवरून आरोपी पसार

एका विद्यार्थ्याच्या खिशात पैसे न सापडल्याने त्यांनी कार्तिक देवरे याच्या फोनवर ऑनलाईन पैसे पाठवण्यास भाग पाडले. स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पोलिसांत तक्रार न करण्यासाठी संशयित टोळक्याने, ‘आमच्याकडून या विद्यार्थ्यांनी उधारी घेतली आहे’ असा एक खोटा व्हिडिओ विद्यार्थ्यांना बनवण्यास भाग पाडले. यानंतर आरोपी एमएच ४१ बीआर ६०२२ क्रमांकाची स्कार्पिओ गाडी आणि दुचाकीवरून पसार झाले.

Web Title: A mob broke into students homes and robbed them incident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Beaten Case
  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
2

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.