(फोटो सौजन्य: Pinterest)
ग्वाल्हेरच्या सिकंदर कम्पू परिसरातील रहिवासी राजकुमार कुशवाह यांनी पोलिस स्टेशन गाठत पत्नी पूनम कुशवाह हिच्या विरोधात गंभीर आरोप लावले. त्यांनी पोलिसांकडून स्वत:च्या सुरक्षेची मागणी केली आणि पत्नीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही केला. माहितीनुसार, २००८ मध्ये राजकुमार यांचा विवाह पूनम कुशवाह हिच्यासोबत हिंदू परंपरेनुसार पार पडला. लग्नानंतर त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला. सामान्य कुटुंबाप्रमाणे त्यांच्यात सर्वकाही सुरळीत सुरु होते पण काही काळानंतर अचानक पत्नीच्या वागणूकीत राजकुमार यांना बदल जाणवू लागला.
पिडिताने केलेल्या दाव्यानुसार, २२ जानेवारी २०२५ रोजी पत्नी अचानक घरातून निघून गेली आणि इथूनच वाद सुरु झाला. जवळपास दोन महिन्यांनंतर मार्चमध्ये जेव्हा ती परत आली तेव्हा तिने सांगितलं की, ती कमल सेन नावाच्या तरुणासोबत राहत आहे. राजकुमारने आरोप केला की, पत्नीने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की जर त्याला तिच्यासोबत रहायचे असेल तर तिच्या बाॅयफ्रेंडलाही घरात घ्यावं लागेल. पत्नीच्या या प्रस्तावाला राजकुमारने विरोध केला ज्यावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला.
Jalna Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्घृण हत्या; जालन्यात खळबळ
पिडिताने दावा केला की, ५ मे २०२६ रोजी पत्नी पुन्हा एकदा घरी आली आणि तिने त्याला धमकी देण्यास सुरुवात केली. खोट्या आरोपांमध्ये फसवून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन असं म्हणत तिने स्वत:चं डोकं देखील फोडलं. यानंतर घरातील सर्व सोनं, दागिणे आणि मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. जाता जाता तिने राजकुमारला जीवे मारण्याचीही धमकी दिली. पोलिसांनी पतीची तक्रार दाखल केली असून सर्व आरोपींची आता चाैकशी केली जात आहे. पतीने केलेले दावे खरे आहेत का आणि पत्नीच्या घर सोडण्यामागे नक्की कोणते कारण आहे या सर्व बाबींचा आता पोलिस तपास करत आहेत.






