Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच आई-वडिलांवर हल्ला; भोसरीतील धक्कादायक घटना

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भोसरी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 12, 2026 | 01:21 PM
दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच आई-वडिलांवर हल्ला; भोसरीतील धक्कादायक घटना

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच आई-वडिलांवर हल्ला; भोसरीतील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:
  • दारूसाठी पैसे न दिल्याने आई-वडिलांवर हल्ला
  • भोसरीतील श्रीरामनगरमध्ये घडली घटना
  • राहुल तळोले याला पोलिसांकडून अटक
पिंपरी-चिंचवड : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भोसरी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. ही घटना गुरुवारी (८ ऑक्टोबर) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास श्रीरामनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली आहे. याप्रकरणी राहुल प्रल्हाद तळोले (वय ४५, रा. भोसरी) याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ६३ वर्षीय आईने याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल तळोले हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला आहे. घटनेच्या रात्री त्याने वडील प्रल्हाद तळोले यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने शिवीगाळ सुरू केली. रागाच्या भरात त्याने वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि छातीवर लाथ मारली. इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने थेट स्वयंपाकघरातून धारदार चाकू आणून वडिलांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करण्याचा प्रयत्न केला. हे भांडण सोडवण्यासाठी आई मध्ये पडल्या असता, चाकूचा वार त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसला आणि त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर आरोपीने आईच्या पोटात लाथ मारून त्यांना ढकलून दिले.

वडील प्रल्हाद तळोले यांना वाचवण्यासाठी आई पुन्हा धावून गेल्या असता, आरोपीने वडिलांच्या डाव्या डोळ्यावर बुक्कीने जोरदार प्रहार केला आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर जखमी आईने धाडस करून भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी राहुल तळोले याला अटक केली आहे. जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसरी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबात किती टोकाची भांडणे होऊ शकतात, याचे हे विदारक उदाहरण समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा : नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर

Web Title: An incident has occurred in bhosari where a son assaulted his parents nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर
1

नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर

Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य
2

Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
3

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक
4

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.