Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

नांदेड शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या एका हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2026 | 02:47 PM
नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

Follow Us
Follow Us:
  • मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या
  • सोनू कल्याणकर (वय 35) असे मृत व्यक्तीचे नाव
  • शहरात भीतीचे वातावरण निर्माण
नांदेड : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. अशातच आता नांदेडमधून एक मोठी बातमी बातमी समोर आली आहे. नांदेड शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या एका हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली आहे.

 

सोनू कल्याणकर (वय 35) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो श्रीनगर परिसरातील रहिवासी होता. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला होता. श्रीनगर मार्गावरून जात असताना तीन ते चार जणांनी त्याला घेरले आणि पोट व पाठीत वार करत गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कल्याणकर याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत नांदेडमध्ये झालेला हा पाचवा खून असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : व्हीआयपींच्या वाढत्या दौऱ्यांमुळे पुणे पोलिसांची दमछाक! गुन्हे शाखाही बंदोबस्तात

तीन वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला

सोनू कल्याणकर याच्यावर तीन वर्षांपूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता. रींदा गँगशी संबंधित गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी तो थोडक्यात बचावला होता. सध्या गोलू मंगनाळे तुरुंगात असून या हत्येमागे त्याचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. सोनू कल्याणकर हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता. काही दिवसांपूर्वीच त्याने भाजप सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: A shiv sena worker who went for a morning walk was murdered in nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • nanded news

संबंधित बातम्या

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
1

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

वनपुरी जमीन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट! बोगस दस्तसाठी महिलांचा वापर; गुन्ह्याच्या नवीन फंडाने पोलिसही चक्रावले
2

वनपुरी जमीन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट! बोगस दस्तसाठी महिलांचा वापर; गुन्ह्याच्या नवीन फंडाने पोलिसही चक्रावले

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
3

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
4

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.