Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Murder Case : 14 जणांच्या टोळक्याकडून तरुणाचा खून; पर्वतीमधील धक्कादायक घटना

पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून १४ जणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सिंहगड रोड परिसरातील पानमळा येथे घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2026 | 06:26 PM
14 जणांच्या टोळक्याकडून तरुणाचा खून; पर्वतीमधील धक्कादायक घटना

14 जणांच्या टोळक्याकडून तरुणाचा खून; पर्वतीमधील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून १४ जणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सिंहगड रोड परिसरातील पानमळा येथे घडला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे, तर पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शुभम राजू घोडके (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी त्याचा मेहुणा विष्णू शिवाजी शिरसाठ (वय २२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अर्जुन कांबळे, अनिकेत कांबळे, गणेश कदम, मुंकुद राजगुरू आणि अंकुश काळे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वृंदावन नर्सरीजवळील पानमळा परिसरात घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम घोडके हा वडगाव बुद्रुक येथील चरवड वस्तीमध्ये राहत होता. तो एका कार कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला होता. घटनेच्या दिवशी शुभम हा तक्रारदार विष्णू शिरसाठ यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जात होता. त्यावेळी आरोपी परत येताना त्यांची नजर शुभमवर पडली. ‘हा पठारावरचा आहे, मारा याला,’ असे म्हणत आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. १४ जणांच्या टोळक्याने शुभमला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शुभमचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. तसेच पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक महाले करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्ह्यात चोट्यांचा उच्छाद, भोरमधील ‘स्वप्नलोक सोसायटी’तील 5 बंद घरे फोडली; तब्बल…

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार

रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करणाऱ्या मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, साथीदाराविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका मजुराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रकाश राजेंद्र जाधव (वय ३३), नीलेश उद्धव गुरव (वय ३५, दोघे रा. माऊली काॅलनी, काळेपडळ, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A shocking incident has occurred in pune where a gang murdered a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.