
वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्...
विपूल कदम (वय २८ रा. वाघोली ) असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील सुर्यवंशी आणि स्वप्नील सूर्यवंशी दोघेही (रा. घोरपडी गाव) यांच्यासह इतर तिघांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. आकाश कदम (वय ३० रा. वाघोली) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आकाशचा भाऊ विपुल हे कुटुंबियासह वाघोलीतील केसनंद परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपुर्वी विपूलचे त्याच्या मैत्रिणीसोबत वादविवाद झाले होते. त्याच रागातून १४ ऑक्टोबरला मैत्रिणीच्या भावडांनी विपुलला वाद मिटवण्यासाठी ग्रीन नाईन हॉटेल जवळ बोलावले. त्यावेळी टोळक्याने विपुलला बेदम मारहाण केली. त्यानंतर मैत्रिणीच्या भावडांनी विपुलवर धारदार शस्त्राने वार करुन खुनी हल्ला केला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या विपुलला सोडून टोळके पसार झाले. याप्रकरणी वाघोली पोलिस तपास करीत आहेत.
जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ
जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी हद्दीतील भोरवाडी (पवार मळा) येथे मंगळवार, दिनांक १२ रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास १० ते ११ जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन एका घरावर तुफान दगडफेक करत वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत घरातील महिलेला मारहाण करून कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात प्रसाद चिंतामण हिंगे याच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.
Ans: वाघोलीतील ग्रीन नाईन हॉटेलसमोर.
Ans: पाच जणांनी.
Ans: वाघोली पोलीस ठाण्यात.