Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी हद्दीतील भोरवाडी (पवार मळा) येथे मंगळवार, दिनांक १२ रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास १० ते ११ जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन एका घरावर तुफान दगडफेक करत वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 15, 2026 | 04:51 PM
जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

Follow Us
Follow Us:
  • जुन्नर तालुक्यात टोळक्याचा धुमाकूळ
  • टोळक्याने घराबाहेरील वाहनांची तोडफोड केली
  • घरातील महिलेलाही मारहाण केली
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी हद्दीतील भोरवाडी (पवार मळा) येथे मंगळवार, दिनांक १२ रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास १० ते ११ जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन एका घरावर तुफान दगडफेक करत वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत घरातील महिलेला मारहाण करून कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात प्रसाद चिंतामण हिंगे याच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

 

परिसरात प्रचंड घबराट व खळबळ, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

या हल्ल्यादरम्यान फिर्यादीचे पती प्रशांत रजपूत यांनी जमावातील एका हल्लेखोराला ओळखले असून, त्याचे नाव प्रसाद चिंतामण हिंगे (रा. खोडद, गडाचीवाडी, ता. जुन्नर) असल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री कोयते उगारून झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे आणि तोडफोडीमुळे भोरवाडी परिसरात प्रचंड घबराट व खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या पूर्ववैमनस्यातून किंवा कारणावरून करण्यात आला, तसेच जमावातील इतर अनोळखी इसम कोण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तळपाडे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही

अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी 

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी रितिका प्रशांत रजपूत (वय २२ वर्षे, व्यवसायः शेती, रा. भोरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) या आपल्या कुटुंबीयांसह घरी असताना मंगळवारी मध्यरात्री अचानक १० ते ११ जणांचे टोळके हातात कोयते घेऊन घरासमोर आले. या टोळक्याने परिसरात दहशत माजवत घरावर जोरदार दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत घरावरील सिमेंटचे पत्रे फुटून मोठे नुकसान झाले. तसेच घराच्या आवारात उभ्या असलेल्या दोन वाहनांची टोळक्याने बेसुमार तोडफोड केली. यावेळी गोंधळ ऐकून बाहेर आलेल्या रितिका रजपूत यांच्या कानाखाली टोळक्यातील एकाने मारहाण केली, तसेच संपूर्ण कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जुन्नर तालुक्यात घरावर हल्ल्याची घटना कुठे घडली?

    Ans: जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी हद्दीतील भोरवाडी (पवार मळा) येथे मंगळवारी, १२ तारखेला मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

  • Que: घरावर हल्ला करणाऱ्या टोळक्याने काय केले?

    Ans: १० ते ११ जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन घरावर दगडफेक केली आणि वाहनांची तोडफोड केली. तसेच घरातील महिलेला मारहाण करून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

  • Que: जुन्नरमधील घरावरील हल्ल्याप्रकरणी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला?

    Ans: या प्रकरणी प्रसाद चिंतामण हिंगे याच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

Web Title: An incident has occurred in junnar taluka where a group of people vandalized vehicles nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Arrested
  • crime news
  • junnar news

संबंधित बातम्या

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
1

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
2

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…
3

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ
4

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.