Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्कूल बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी; संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पाच वर्षांचा बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली आहे. अपघातात बालकाची आई गंभीर जखमी झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 04, 2025 | 01:23 PM
स्कूल बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी; संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

स्कूल बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी; संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Follow Us
Close
Follow Us:
  • स्कूल बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू
  • आई गंभीर जखमी
  • संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पाच वर्षांचा बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली आहे. अपघातात बालकाची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसंनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाला अटक केली आहे. याप्रकरणी मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक, मुख्याध्यापकासह चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ तुळशीराम भंगारे (वय ५) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. अपघातात साईनाथची आई रेखा तुळशीराम भंगारे (वय २८,रा. गणराज हाईट्स, सावली होम सोसायटीजवळ, उरूळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) गंभीर जखमी झाल्या आहेत. रेखा यांनी याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालक संस्कार अनिल भोसले (रा. पांडवनगर, वडकी, हडपसर-सासवड रस्ता) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक संजय वसंत मोडक, मुख्याध्यापक डॉ. आरती जाधव, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या मालक मनीषा संजय मोडक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ ऊरळी देवाची परिसरातील एका शाळेत शिशूगटात जात होता. मंगळवारी (२ नोव्हेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास रेखा मुलाला घेऊन शाळेत सोडण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी धनगरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसने रेखा आणि साईनाथला धडक दिली. साईनाथ बसच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. बसच्या धडकेत रेखाही जखमी झाल्या. अपघातानंतर साईनाथ आणि रेखा यांना नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच साईनाथ याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक किशोर पवार तपास करत आहेत.

संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी साईनाथचा मृतदेह पोलीस ठाण्यात नेला. फुरसुंगी भागातील एका शाळेची ही बस असल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी शाळेचे प्रशासन, संस्था चालक, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नातेवाईकांच्या आक्रोशामुळे परिसरात शोककळा पसरली.

Web Title: A shocking incident has occurred in which a young child died in a school bus collision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Accident News
  • Pune Crime
  • school bus

संबंधित बातम्या

Pune Crime: पत्नीचा शारीरिक संबंधासाठी आग्रह! पती सक्षम नसल्याने पत्नीला दिले सिगारेटचे चटके; पुण्यातील घटना
1

Pune Crime: पत्नीचा शारीरिक संबंधासाठी आग्रह! पती सक्षम नसल्याने पत्नीला दिले सिगारेटचे चटके; पुण्यातील घटना

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?
2

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचा ऐवज जप्त
3

सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचा ऐवज जप्त

Satara News : वाठारजवळ सहलीच्या बसला अपघात; दहा विद्यार्थी गंभीर जखमी
4

Satara News : वाठारजवळ सहलीच्या बसला अपघात; दहा विद्यार्थी गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.