Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: दोन दुचाकींना धडक देत फॉर्च्युनर थेट टपरीवर; मारुंजीतील अपघाताने परिसरात खळबळ

Accident: फिर्यादी हे दुचाकीवरून हिंजवडी व्हेज दोन कडून चांदखेडकडे चालले होते. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या फॉर्च्यूनर कारने दुचाकीला जोरात धडक दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 24, 2026 | 08:51 AM
फॉर्च्यूनर कारने दिली दुचाकीला धडक

फॉर्च्यूनर कारने दिली दुचाकीला धडक

Follow Us
Follow Us:
  • दोन दुचाकींना धडक देऊन फॉर्च्यूनर कार टपरीवर आदळली
  • कार टपरीवर आदळून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू
  • गाडी चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची शक्यता
पिंपरी: भरधाव फॉर्च्युनर कार चालकाने दोन दुचाकींना धडक (Crime) दिल्यानंतर कार टपरीवर आदळून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला ही घटना मारुंजी येथे गुरुवारी (दि. २२) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. अमोल नथू गायकवाड (वय ४३, रा. रसिकवाडी, जांबे, ता. मुळशी) असे मृत्युमुखी पडलेल्या कारचालकाचे नाव आहे. ज्ञानेश्वर पांडुरंग गायकवाड (वय 38, रा. चांदखेड, ता. मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे दुचाकीवरून हिंजवडी व्हेज दोन कडून चांदखेडकडे चालले होते. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या फॉर्च्यूनर कारने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यानंतर पुढे जाऊन गणेश मित्र मंडळ गणपती मंदिराजवळ पल्सर चालक ऑमकार विठोबा राऊत (वय २४, रा. नेरे-दत्तवाडी ता. मुळशी) यांना मागून धडक दिली. यात राऊत जखमी झाले. त्यानंतर फॉर्च्यूनर कार रस्त्याकडेला असलेल्या टपरीवर जाऊन आदळली. या अपघातात अमोल गायकवाड यांचा मृत्यू झाला.

Accident News: नवरात्रीत काळाचा घाला! माता मंदिराजवळ भरधाव ट्रकचा कहर; १२ भाविकांचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता

फॉर्च्यूनर कार मधून जात असताना अमोल गायकवाड यांना गाडी चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि पुढे जाणाऱ्या दोन दुचाकींना कारची धडक बसली. त्यानंतर कार रस्त्यात कडेच्या टपरीवर आदळली.

आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित कारच्या दिशेने धाव घेतली असता चालक गायकवाड हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गायकवाड यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

म्हसवड रस्त्यावर अपघात 

म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक (राजेमाने यांचा मळा) येथे दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास दोन इर्टिका कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारमधील सहा प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फॉर्च्युनर कारने कोणाला दिली धडक?

    Ans: फॉर्च्युनर कारने मारुंजीने येथे दोन दुचाकींना धडक दिली.

  • Que: अपघाताचे कारण काय?

    Ans: फॉर्च्यूनर कार मधून जात असताना अमोल गायकवाड यांना गाडी चालवत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: High seed fortuner car hit bikes and shop drive death major accident marunji pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • Pimpri News

संबंधित बातम्या

Dharashiv Accident News: तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर
1

Dharashiv Accident News: तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर

जळगाव हादरले! जामनेर तालुक्यात मका काढणीच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; तीन लहान मुलांचे पितृछत्र हरपले
2

जळगाव हादरले! जामनेर तालुक्यात मका काढणीच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; तीन लहान मुलांचे पितृछत्र हरपले

Mumbai News: साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी! आपत्कालीन दुर्घटनांचे सत्र, आरटीआयमधून धक्कादायक वास्तव झाले उघड
3

Mumbai News: साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी! आपत्कालीन दुर्घटनांचे सत्र, आरटीआयमधून धक्कादायक वास्तव झाले उघड

जंगलात शिकारीला गेले, प्राण्याचे डोळे समजून साथीदारावर गोळी; मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार
4

जंगलात शिकारीला गेले, प्राण्याचे डोळे समजून साथीदारावर गोळी; मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.