Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासेमारी करताना दुर्दैवी घटना; वीज कोसळून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. संतोष गुलाब खांडवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 27, 2025 | 02:18 PM
मासेमारी करताना दुर्दैवी घटना; वीज कोसळून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मासेमारी करताना दुर्दैवी घटना; वीज कोसळून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असतानाच खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. संतोष गुलाब खांडवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

खेड पोलिसांच्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मौजे पाईट-रोंधळवाडीत भामा आसखेड धरण आहे. या धरावर मासेमारी करण्यास मोठ्या प्रमाणात तरुण असतात. दरम्यान, खांडवे सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास मासेमारी करत होता. त्या वेळी अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. वीज कडाडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. तेव्हा खांडवे जळालेल्या अवस्थेत सापडला. त्याला मित्रांनी तातडीने पाईट गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी एम. एस. सुतार, ग्राम महसूल अधिकारी एम. जी. क्षीरसागर, पाईट ग्रामपंचायत अधिकारी ए. एन. फुलपगर, उपसरपंच जयसिंग दरेकर, दीपक डांगले, अनिल रौंधळ, विपुल खेंगले, कबीर रौंधळ, हरिभाऊ रौंधळ, नवनाथ डांगले यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. खांडवे याच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, तसेच पाईट परिसरात वीज प्रतिबंधक मनोरा बसविण्यात यावा, अशी मागणी जयसिंग दरेकर यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात दुर्दैवी घटना; अंगावर झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

दौंडमध्ये भिंत कोसळून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

दौंडमध्ये दुकानाचा काही भाग कोसळून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. या घटनेत ताराबाई विश्वचंद्र आहेर (वय ७५) या मृत्यू झाला आहे. आहेर यांचे दौंडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वैष्णवी फ्लावर मार्ट दुकान आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आहेर या दुकानात थांबल्या होत्या. दुकानातील भिंतीचा जीर्ण झालेला भाग आहेर यांच्या अंगावर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने दौंडमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. तहसीलदार ममता भंडारे यांना घटनेची माहिती कळविण्यात आली.

Web Title: A shocking incident has occurred in which a young man died after being struck by lightning while fishing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Death
  • heavy rains
  • Rain Update

संबंधित बातम्या

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा
1

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
2

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी
3

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात
4

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.