Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

मावळ तालुक्यातील निळशी गावात झोपेत असलेल्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 17, 2026 | 04:26 PM
मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात झोपेत असलेल्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडगाव मावळ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरिभाऊ वसंत कांबळे (वय २४, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे चुलते कुलदीप चंद्रकांत कांबळे (वय ३४, सध्या रा. दहिसर, मुंबई) हे गावातील प्रमोद दत्तात्रय म्हसे यांच्या टेरेसवर झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला आहे.

मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या तलवारीसारख्या धारदार शस्त्राने आरोपीने कुलदीप कांबळे यांच्या चेहऱ्याच्या डाव्या गालावर वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी विविध शक्यतांचा तपास सुरू केला आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील माहिती गोळा केली जात असून, संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मानसी कोचे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राजळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक कैलास कदम यांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन राउळ करत आहेत. दरम्यान, गावात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

आरपीआयच्या पदाधिकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

आरपीआय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या अध्यक्षाची दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी (१३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास मोशी टोलनाका परिसरातील युवराज गार्डन हॉटेलमध्ये घडली आहे. जुन्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य सूत्रधार म्हणून नितीन धोत्रे याचे नाव समोर आले आहे. अनिल मारुती गोळे उर्फ मोरे (वय ४६, रा. कुरुळी, खेड) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोरे यांच्या वाहनावरील चालक नागनाथ कुंडलिक चाटे (वय ४३, रा. कुरळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: A shocking incident has taken place in maval taluka where a person was attacked with a sharp weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maval news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.