Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

केशवनगर येथील कचरा डेपोच्या रोडलगत गळा दाबून तरुणीचा खुन करुन तिला फेकून दिलेल्या प्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2026 | 12:30 AM
पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, केशवनगर येथील कचरा डेपोच्या रोडलगत गळा दाबून तरुणीचा खुन करुन तिला फेकून दिलेल्या प्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा आणि मुंढवा पोलिसांनी एका कॅबचालकाला याप्रकरणी अटक केली असून, पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.

 

गोरखनाथ देवराम शिंदे (वय ४२, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे या कॅबचालकाचे नाव आहे. आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

गेल्या आठवड्यात केशवनगर कचरा डेपोजवळील रोडवर मध्यरात्री तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्यावरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मृतदेह सापडला, त्याच्या आजूबाजूला सीसीटीव्ही नव्हते. पोलिसांनी तेथे येणार्‍या जाणार्‍या रोडवरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यातून एक कॅब संशयास्पद वाटली. त्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने या कॅब चालकाचा शोध घेऊन त्याला पकडले़. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.

आफरीन पठाण ही ब्युटी पार्लरचे काम करत होती. या कामासाठी जाण्या- येण्यासाठी ती गोरखनाथ शिंदे याच्या कॅबमधून जात होती. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. अनैतिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. तिने गर्भपात करण्यास शिंदे याच्याकडे १ लाख रुपये मागितले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागला. तिने त्याच्या घरी सांगण्याची धमकी दिली होती. स्वत:च्या घरी व बायकोला कळेल, या भितीपोटी शिंदे याने ५ मे रोजी रात्री पावणे नऊ वाजता आफरीन हिला खराडी बायपास रिलायन्स मॉल येथे घेऊन गाडीत बसवुन खराडी मार्गे, आव्हाळवाडी येथे घेऊन गेला. तो ५० हजार रुपये घेऊन गेला होता. यावरुन त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याने तिचा गळा दाबून तिला मारुन टाकले. तिला गाडीत घालून तो खराडी पासून केशवनगर मार्गे रोडने येताना कचरा डेपोच्या जवळ त्याने तिचा मृतदेह टाकून दिला. केशवनगर मार्गे, तो मुंढवा चौकातून चंदननगर मधील कामगार वसाहत येथील घरात आला, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा : सुरक्षा रक्षकाकडून चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; 7 व्या मजल्यावर घेऊन गेला अन्…

Web Title: A shocking incident has taken place in pune where a beauty parlor driver strangled a young woman to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
1

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
2

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
3

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
4

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.