Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

हाताने आणि रस्सीने गळा आवळून पत्नीचा खून केल्यानंतर पती स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात हजर झाल्याचा प्रकार समोर आला. चारित्र्याचा संशय व मुलबाळ होत नसल्याच्या कारणातून खून केल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 29, 2025 | 12:30 AM
मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

Follow Us
Follow Us:
  • मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून
  • पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
  • पुण्यातील घटनेमुळे मोठी खळबळ
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. हाताने आणि रस्सीने गळा आवळून पत्नीचा खून केल्यानंतर पती स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात हजर झाल्याचा प्रकार समोर आला. चारित्र्याचा संशय व मुलबाळ होत नसल्याच्या कारणातून खून केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रियांका आकाश दोडके (वय २७, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फुरसूंगी पोलिसांनी पती आकाश विष्णु दोडके (वय ३५) याला अटक केली आहे. ही घटना त्यांच्या भेकराईनगर येथील राहत्या घरी रात्री साडेदहा वाजता घडली आहे. याबाबत प्रियंका यांचा भाऊ सागर रामदास अडागळे (वय ३५, रा. नानगांव, दोंड) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश वाहनचालक म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी प्रियांका गृहिणी होती. १८ फ्रेब्रुवारी २०१८ मध्ये प्रियांकाचा आकाशसोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून आकाश प्रियांकावर संशय घेत होता. मुलबाळ होत नसल्याने त्यांच्यात वाद होत होते. तो सतत प्रियांकाला शिवीगाळ करून मारहाण करत होता. प्रियांकाने याबाबत कुटूंबाला कल्पना दिली होती. त्यामुळे मागील ३ वर्षापासून प्रियांका आकाश सोबत न राहता भावाकडे राहत होती.

आठ दिवसापुर्वीच आकाशने प्रियांकाला नांदण्यासाठी ये म्हणून फोन केला होता. त्यामुळे ती त्याच्याकडे पुण्यात राहण्यास आली होती. २५ डिसेंबर रोजी परत प्रियांका नानगांव दौंड येथे भावाच्या घरी आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता पुण्याला निघून गेली. त्या दिवशी सागरच्या पत्नीने प्रियांकाच्या मोबाईलवर फोन केला. मात्र तिने तो उचलला नाही. त्यामुळे तिने आकाशच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी त्याने प्रियांका घरातून निघून गेल्याचे सांगितले. आकाशने प्रियांकाचा रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास राहत्या घरी हाताने व रस्सीने गळा आवळून खून केला. नंतर आकाश स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. फुरसूंगी पोलिस त्याच्या राहत्या घरी आकाशला घेऊन गेले. प्रियांकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. परंतू तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रियांकाच्या भावाला फुरसूंगी पोलिसांनी ही माहिती दिली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a husband murdered his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.