पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण; भरधाव कारने माय-लेकाला उडवले
पुणे : राज्यात अपघातांट्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अपघाताच्या घटना घडल्याचे दिवसून यत आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात “हिट अँड रन”चा प्रकार समोर आला असून, एका भरधाव कारने दुचाकीस्वार माय-लेकांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर आई जखमी झाली आहे.
मयूर रमेश पिंपळे (वय २८, रा. आनंदपार्क, भैरवनगर, धानोरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात मयूर याची आई गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मयूर आणि त्याची आई हे आनंदपार्क परिसरातून १८ जुलै रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी भरधाव कारने यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार मयूर याला गंभीर दुखापत झाली, तसेच सहप्रवासी आई जखमी झाली. उपचारादरम्यान मयूर याचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक पसार झाला.
हे सुद्धा वाचा : शिरोलीत दोन ठिकाणी चोरी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास
पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्याची ओळख पटली असून, त्याचा शोध घेतला जात आहे. मयुर एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तो आईला घेऊन बाहेर जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले अधिक तपास करत आहेत.
भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
भरधाव कारच्या धडकेत एका सायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पसार झालेल्या चालकावर बंडगार्डन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. रामप्रतापसिंग महेसिंग राजावत (वय ५२, रा. भैय्यावाडी, ताडीवाला रस्ता) असे मृत्यू झालेल्या सायकल चालकाचे नाव आहे. याबाबत बिनीत सिंग (वय ४२, रा. वडाचीवाडी, उंड्री ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोलापूरजवळ मध्यरात्री भीषण अपघात
सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला आहे. आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ.