Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय ३८, रा. बिटरगाव सांगवी, ता. करमाळा) याचा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2026 | 02:42 PM
अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • कृष्णा मोहितेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात झाली होती अटक
  • कुटुंबीयांकडून सखोल चौकशीची मागणी
करमाळा : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय ३८, रा. बिटरगाव सांगवी, ता. करमाळा) याचा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. २३) घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस कोठडीत असताना झालेल्या दुखापतीनंतर मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

 

कृष्णा मोहिते याच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रणजित माने करीत होते. पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी मोहिते याला अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना त्याने भिंतीवर जोरजोरात डोके आपटून स्वतःला इजा करून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने मोहिते याला प्रथम करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेचे नेमके कारण अधिकृत चौकशीच्या माध्यमातूनच स्पष्ट होणार आहे.

भिंतीवर डोके आपटल्याचा दावा

अटकेनंतर पोलीस कोठडीत असताना कृष्णा मोहिते याने स्वतः चे डोके भिंतीवर आपटून घेतल्याने गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेतील परिस्थिती आणि मृत्यूचे नेमके कारण अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…

मृत्यूचे गूढ उकलण्याची मागणी 

पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याने विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोहिते याचा मृत्यू डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे झाला की अन्य काही कारणामुळे, याची सखोल चौकशी करण्यात यावी. मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : पहाटे तरुणांची गाडी अडवली, चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधलेअन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: करमाळ्यातील कृष्णा मोहिते याचा मृत्यू कसा झाला?

    Ans: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते याचा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते.

  • Que: कृष्णा मोहिते याला पोलिसांनी कधी अटक केली होती?

    Ans: करमाळा पोलिसांनी कृष्णा मोहिते याला २० ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना त्याने भिंतीवर डोके आपटून स्वतःला इजा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • Que: कृष्णा मोहिते याच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी काय मागणी केली आहे?

    Ans: पोलीस कोठडीत असताना झालेल्या दुखापतीनंतर मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थिती अधिकृत चौकशीतून स्पष्ट व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

Web Title: An incident has occurred in solapur in which an arrested accused has died nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Death

संबंधित बातम्या

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार
1

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…
2

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…

Kalyan News: खाकी वर्दीचा गैरवापर? मज्जाव केल्याचा राग धरत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप!
3

Kalyan News: खाकी वर्दीचा गैरवापर? मज्जाव केल्याचा राग धरत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप!

टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; इंदूरमधून आणखी एकाला पोलिसांनी केली अटक
4

टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; इंदूरमधून आणखी एकाला पोलिसांनी केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.