Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?

गेवराई शहरातील कोल्हेर रोडवरील आधारवड बँकेसमोर दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाला अनोळखी व्यक्तीने पाठीमागून कत्तीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 12, 2026 | 03:33 PM
दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला
  •  गेवराईतील घटनेनं  खळबळ
  • अनोळखी हल्लेखोराचा शोध सुरू
गेवराई : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता गेवराई शहरातील कोल्हेर रोडवरील आधारवड बँकेसमोर दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाला अनोळखी व्यक्तीने पाठीमागून कत्तीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसेफ जावेद बेग (वय १९, व्यवसाय मजुरी, रा. सावतानगर, गेवराई) हा तरुण दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील कोल्हेर रोडवरील आधारवड बँकेसमोरून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून त्याच्या पाठीमागे बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने कत्तीने मारहाण केली. या मारहाणीत आसेफ जखमी झाला. मारहाण करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर जखमी तरुणाने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गेवराई पोलिस ठाण्यात शनिवार, दिनांक १० रोजी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून, मारहाण करणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हे सुद्धा वाचा : ३५ लाखांची सुपारी, तिहेरी हत्याकांडाचा कट; जळगाव पोलिसांनी पाच शार्प शूटर्सना पकडले

पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून

मित्राला दिलेले उसने पैसे परत मागण्यावरून झालेल्या वादानंतर दोघांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचाच भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाषाणमधील आयटीआय ग्राऊंड गेटसमोर ही घटना रात्री उशिरा घडली आहे. सहदेव रामप्रकाश शर्मा (वय ३३, रा. सुसगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात कृष्णा रामप्रकाश शर्मा (वय ३६, रा. सुसगांव) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून बंटी उर्फ आशिष चक्रनारायन याच्यासह तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: A shocking incident involving an attack on a young man has occurred in georai nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Beed Crime
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pune Murder : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून
1

Pune Murder : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच आई-वडिलांवर हल्ला; भोसरीतील धक्कादायक घटना
2

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच आई-वडिलांवर हल्ला; भोसरीतील धक्कादायक घटना

नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर
3

नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर

Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य
4

Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.