Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर

नेवासे बुद्रुक परिसरातील नागफणी येथील रमेश छगन भोसलेवर शनिवार दिनांक १० रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान झालेल्या हल्ला व गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीघांना जेरबंद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 12, 2026 | 12:11 PM
नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर

नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर

Follow Us
Follow Us:
  • नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
  • आणखी तीन आरोपी जेरबंद
  • अटकेतील आरोपींची संख्या सहावर
नेवासे : नेवासे बुद्रुक परिसरातील नागफणी येथील रमेश छगन भोसलेवर शनिवार दिनांक १० रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान झालेल्या हल्ला व गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीघांना जेरबंद केले आहे. या गुन्ह्यातील एकूण दहापैकी आत्तापर्यंत सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी कल्याण चव्हाण, कुणाल चव्हाण, अभिषेक चव्हाण व इतर ७ आरोपी अशांनी मिळून पोलीसांना माहिती देतो का असे म्हणून बंदुकीने रमेश भोसले याचे पाठीत गोळी मारली. तसेच कोयत्याने, चाकुने, कुऱ्हाडीने रमेश याचे डोक्यावर, हातावर, पोटावर, पायावर वार केले.

 

स्थानिकच्या पोलिसांनी यांना घेतले ताब्यात

इतर आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. याप्रकरणी नेवासे पोलीसांत गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे वाळूज परिसरात आरोपीचा शोध घेऊन उमेश हरिसिंग भोसले (वय २८, रा. बाभुळखेडा, ता. नेवासे), आकाश गौतम चव्हाण, (वय २०, रा. इमामपूरवाडी, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले. गुन्हयातील इतर आरोपीचा नेवासे परिसरात शोध घेत असताना कुणाल कल्याण चव्हाण (वय ३४, रा. जळके खु. ता. नेवासे) हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, ताब्यातील आरोपी उमेश हरिसिंग भोसले हा सराईत आरोपी असून, त्याच्यावर यापुर्वी वाळुंज, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दोन गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना तपासकामी नेवासे पोलीसांत हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा पुढील तपास नेवासे पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी

या पथकाची कामगिरी 

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रोहित येमुल, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, सागर ससाणे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांनी आरोपींना अटक केली आहे.

Web Title: The police have arrested three more accused in the nevase firing case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य
1

Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
3

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
4

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.