
मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून
पोलिसांच्या माहितीनसार, सहदेव हा शेअर मार्केटींगचे काम करत होता. दरम्यान, सहदेव शर्मा याचा मित्र, ज्ञानेश्वर भोई याने आरोपी बंटी चक्रनारायन याच्याकडून ३ लाख रुपये हात उसने घेतले होते. मात्र, ते पैसे परत देण्यावरून त्यांच्यात वादविवाद सुरू होते. त्यांच्यातील पैशांच्या व्यावहारात मित्र म्हणून सहदेव हा मध्यस्थी करत होता.
दरम्यान, सहदेव व त्याचा मित्र ओंकार डोईफोडे हे रविवारी रात्री साडे आकराच्या सुमारास येथील आयटीआय ग्राऊंड परिसरात फेरफटका मारण्यास गेले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी पैश्यांच्या व्यवहारातील मध्यस्थी तसेच आरोपीच्या कुटूंबियाबद्दल सहदेवने अपशब्द वापरल्याबाबत गैरसमजातून त्याच्याशी वाद घातला. त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. सहदेव याने आरोपींना प्रतिकार केल्यानंतर आरोपींनी तीक्ष्ण शस्त्राने सहदेव याच्यावर सपासप वार केले. त्याला भोसकले. तो रस्त्यावर पडल्यानंतर देखील त्याला ओढत फुटपाथवर नेहून त्याठिकाणी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत सहदेव गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती बाणेर पोलिसांनी दिली.
हे सुद्धा वाचा : दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच आई-वडिलांवर हल्ला; भोसरीतील धक्कादायक घटना