Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Daund Murder : दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या

दौंड शहरात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात केवळ १२ तासांच्या आत २ आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2026 | 02:46 PM
दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या

दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

दौंड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड शहरात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात केवळ १२ तासांच्या आत २ आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत दौंड पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमन किसन शिंदे (वय ७०, रा. आर.बी. १ नगरमोरी, दौंड) या ज्येष्ठ महिलेचा धारधार शस्त्राने खुन झाल्याची घटना पोलीस बुधवारी (दि. १९ ) रोजी दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत महिलेची मुलगी तृप्ती सचिन हिरवे ( वय ४५, रा. रामलिंग रोड, शिरूर )यांना त्यांचे मामा अशोक धोंडीबा पोळ यांनी फोन करून खुनाची माहिती दिली. फिर्यादी आपल्या पतीसह दौंड उपजिल्हा रुग्णालयात गेल्या असता त्यांनी सदर मृतदेह आपल्या आईचा असल्याचे सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार अज्ञात आरोपीने धारदार हत्याराने गळ्यापासून शिरच्छेद करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शिर वेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनासह गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन दौंड पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.  या पथकाने तपासा दरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट, (रा. समतानगर, दौंड) व प्रसाद बाबूलाल चव्हाण, (रा. आर.बी. १ नगरमोरी, दौंड) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे हे करीत आहेत.

दौंड पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, विनायक सपाटे, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, ज्ञानेश्वर राऊत, सहाय्यक फौजदार आसिफ शेख, सचिन घाडगे, पांडुरंग थोरात, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, नितीन बोराडे, धनंजय गाढवे, निखिल जाधव, आमिर शेख, किरण पांढरे, महेंद्र लोहार, पवन माने, सोमनाथ चौंडे, निखील पवार, हजारे, अक्षय कुंभार, ओमनाथ तुमकुटे, तांबोळी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पुढील तपास सुरू असून हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा : वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

Web Title: A shocking incident involving the murder of a woman has occurred in daund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई
1

दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई

Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ…
2

Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ…

जावयाच्या छातीत भाला खुपसून निर्घृण खून; सासरा, सासू, पत्नी आणि दोन मेहुण्यांना जन्मठेपेची शिक्षा
3

जावयाच्या छातीत भाला खुपसून निर्घृण खून; सासरा, सासू, पत्नी आणि दोन मेहुण्यांना जन्मठेपेची शिक्षा

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.