Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनीषाला नऱ्हेत भेटायला बोलावले, गोड बोलून दाट झाडीत नेले अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2026 | 04:31 PM
मनीषाला नऱ्हेत भेटायला बोलावले, गोड बोलून दाट झाडीत नेले अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना

मनीषाला नऱ्हेत भेटायला बोलावले, गोड बोलून दाट झाडीत नेले अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज खून, हाणामाऱ्या, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा येथे घडली आहे. तरुणीचा खून करुन पसार झालेल्या आरोपी तरुणाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली.

 

मनीषा खम्म दमाई (वय २५, सध्या रा. आयुषी काॅम्प्लेक्स, पारी कंपनी चौक, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. ढकारी, जि. आछम, नेपाळ) याला अटक केली आहे. याबाबत किशन भरत परिहार (वय ३५, सध्या रा. ओमशांती बिल्डिंग, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. जि. वाडा, नेपाळ ) याने आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार किशन परिहार याची मनीषा दमाई बहीण आहे. मनीषा हिचे आरोपी किशन परिहार याच्याशी प्रेमसंबंध होते. मनीषा आणि आरोपी किशन हे मूळचे नेपाळचे आहेत. ते रखवालदार म्हणून काम करतात. मनीषाचे किशनशी प्रेमसंबंध होते. आरोपी किशन हा काही कामधंदे करत नव्हता. त्यामुळे मनीषाने त्याच्याशी असलेले प्रेमसंबध तोडले. प्रेमसंबंध तोडल्यानंतर आरोपी तिच्यावर चिडला होता.

१८ मार्च रोजी किशन हा मनीषाला नऱ्हे भागात भेटायला आला. त्याने गोड बोलून मनीषाला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ नेले. तेथील एका हॉटेलच्या परिसरात मागील बाजूस दाट झाडी आहे. दाट झाडीत त्याने मनीषाला नेले. तेथे त्याने तिच्याशी वाद घातला. वादानंतर दोरीने गळा आवळून तिचा खून करुन तो पसार झाला. दरम्यान, दाट झाडीत एका तरुणी मृतावस्थेत सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली.

आंबेगाव पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक मुलाणी यांनी तातडीने तपास सुरू केला. मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीची ओळख पटविली. तपासात मिळालेल्या माहितीनंतर आरोपी किशनला ताब्यात घेण्यात आले. प्रेमसंबध तोडल्याने मनीषाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपी किशनने पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Web Title: A shocking incident involving the murder of a young woman has occurred near the katraj tunnel in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.