Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! तिघांवर कोयत्याने सपासप वार; कारणही आलं समोर

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वैमनस्यातून सराइतांनी तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडीत घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 03, 2025 | 03:49 PM
पुणे हादरलं! तिघांवर कोयत्याने सपासप वार; कारणही आलं समोर

पुणे हादरलं! तिघांवर कोयत्याने सपासप वार; कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वैमनस्यातून सराइतांनी तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडीत घडली आहे. याप्रकरणी सराइतांसह साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय हरिसिंग परदेशी (वय ४४), जय अनिल परदेशी (वय २१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सादिक महंमद शेख (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), नूर नजीर शेख, इरफान शेख (दोघे रा. नाडेगल्ली, गणेश पेठ), सलीम कासीम तांबोळी, इम्रान उर्फ इम्मू सत्तार शेख (दोघे रा. कोंढवा) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत सोनू उर्फ माँटी अनिल परदेशी (वय २७, रा. म्हसोबा मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार परदेशी ओळखीचे आहेत. यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. बुधवारी मध्यरात्री आरोपींनी सोनू परदेशी याचे काका अजय आणि लहान भाऊ जय यांना कासेवाडी भागात अडवले. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी काका आणि लहान भावाला सोडविण्यासाठी गेलेला सोनू याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक आकाश थिटे तपास करत आहेत.

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा : चोरांना राहिला नाही धाक! घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली अन्…

दगडाने ठेचून मुलाचा खून

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

Web Title: A shocking incident of a coyote attack on three people has come to light in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
1

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
2

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
3

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
4

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.