Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! चिमुकल्यासमोरच बायकोला संपवलं; बॉडी घेऊन बाईकवरुनचं निघाला अन्…

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने आठ वर्षाच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 06, 2025 | 11:59 AM
पुणे हादरलं! चिमुकल्यासमोरच बायकोला संपवलं; बॉडी घेऊन बाईकवरुनचं निघाला अन्...

पुणे हादरलं! चिमुकल्यासमोरच बायकोला संपवलं; बॉडी घेऊन बाईकवरुनचं निघाला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने आठ वर्षाच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. बबीता निसार असं खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. राकेश राम नाईक निसार असं आरोपी पतीचे नाव आहे. पुण्यातील नांदेड सिटी जवळ ही घटना घडली आहे.

राकेश धायरी परिसरात आपल्या कुटूंबासह वास्तव्यास आहे आणि तो मजुरी काम करतो. रात्री एक वाजताच्या सुमारास स्वामीनारायण मंदिर समोरून भुमकर पूलाजवळ नागरिकांना एक व्यक्ती संशयितरित्या गाडीवरून काहीतरी घेऊन जात असल्याचं पाहिलं आणि त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी भुमकर पुलाजवळ बीट मार्शल पोहोचले आणि त्याला पकडलं असता त्याने गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीट मार्शलने या राकेशला पकडलं आणि त्यावेळी राकेश कडे चौकशी करायला सुरुवात केली. मृतदेह कोणाचा आहे? कुठून आला आहे ? तू कुठे घेऊन चाललाय? या सगळ्याची चौकशी करत असताना राकेशने उडवाउडवीची उत्तर दिली.

मित्रांने हा मृतदेह मागवला आहे, त्याला खेडशिवापूर जवळ नेऊन देतो असं त्याने सांगितलं. मृत पत्नीने फाशी घेतली असल्याचंही त्याने आधी पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांना पुन्हा संशय बळावला आणि त्याच्याकडे पुन्हा विचारणा सुरू केली. नंतर पोलिसांनी थेट राकेशला घेऊन त्याचं धायरीतलं घर गाठलं, तेव्हा राकेश आणि बबिता यांचा आठ वर्षाचा मुलगा घरी झोपलेला दिसला. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता मुलांनी थेट पोलिसांना वडिलांनीच आईला मारून टाकल्याचं सांगितलं. आई आणि वडिलांमध्ये जेवणाच्या कारणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून कायम वाद व्हायचे, आज वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर बाबांनीच आईला गळा दाबून मारून टाकलं असं सांगितलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वयंपाक करण्यावरून आणि घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने आपल्या आठ वर्षाच्या मुलासमोरच पत्नीचा गळा दाबून तीचा खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह कापडात गुंडाळला आणि विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून घेऊन निघाला. मात्र, पत्नीच्या मृतदेहाचा विल्हेवाट लावताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं आणि त्यानंतर चौकशी केली. पोलिसांना त्याने उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र, आठ वर्षाच्या मुलाजवळ चौकशी केली असता पतीचं सगळं पितळ उघड पडलं. आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी राकेश निसार याला पकडलं आणि सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली.

Web Title: A shocking incident of a man murdering his wife in front of their child has come to light in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Murder
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

चाकण नगरपरिषदेचा निष्काळजीपणा? सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर; कारवाई अन् जनजागृतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
1

चाकण नगरपरिषदेचा निष्काळजीपणा? सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर; कारवाई अन् जनजागृतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सासवडमधील महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार; नगरपालिकेत कचऱ्याच्या बादल्या घेऊन जोरदार निषेध  
2

सासवडमधील महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार; नगरपालिकेत कचऱ्याच्या बादल्या घेऊन जोरदार निषेध  

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
3

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
4

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.