Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नी अन् तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मांजरी परिसरात हा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2026 | 04:48 PM
पत्नी अन् तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

पत्नी अन् तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मांजरी परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पत्नी व तिच्या कथित प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रविण दत्ता माने (वय २८, रा. मांजरी, मूळ रा. धुत्ता, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई ललिता दत्ता माने (वय ४८) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रणाली प्रविण माने आणि सुमित जाधव (रा. गाधवड, जि. लातूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रविण एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याचा आणि प्रणालीचा विवाह २० मे २०२५ रोजी झाला होता. २० जुलै रोजी प्रणाली कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. त्यानंतर मांजरी पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर प्रणाली स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली. सासरच्या मंडळींकडून त्रास होत असून त्यांच्यासोबत राहायचे नसल्याचे सांगत ती आई-वडिलांसोबत निघून गेली.

हे सुद्धा वाचा : शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास

फिर्यादीनुसार, प्रणालीने प्रविणला सुमित जाधव याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते. त्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून प्रविणने २३ जुलै रोजी राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रोकडे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या

देवळा तालुक्यातील वाखारी येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी एका तरुण विवाहित महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: A shocking incident of a young man committing suicide has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Police Action
  • Sucide News

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
2

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
3

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
4

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.