Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

हातउसने दिलेले ९४ हजार रुपये परत देण्याच्या बहाण्याने बोलावून तिघांनी गॅरेज चालकाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चिकलठाणा रोडवरिल पुष्पा गार्डन समोर घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2026 | 01:17 PM
हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • ९४ हजार रुपये परत मागितल्याने गॅरेज चालकाला मारहाण
  • पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून लोखंडी पाईपने हल्ला
  • सोहेल खानसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : हातउसने दिलेले ९४ हजार रुपये परत देण्याच्या बहाण्याने बोलावून तिघांनी गॅरेज चालकाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चिकलठाणा रोडवरिल पुष्पा गार्डन समोर घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोहेल सलमान खान (वय ३२, रा. कटकट गेट), साजिद शेख (३०, रा. मोतीवाला कॉलनी, चिकलठाणा), सुलतान शेख (वय ४०, रा. जिन्सी) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात आरेफ खुर्सी मंसुरी (वय २८, रा. केंब्रीजचौक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मंसुरी यांचे सावंगी बायपास येथे कार दुरुस्तीचे गॅरेज आहे. अडीच महिन्यांपूर्वी त्यांनी सोहेल सलमान खान याला एक लाख रुपये हातउसने दिले होते. सोहेलने त्यापैकी सहा हजार रुपये परत केले; मात्र उर्वरित ९४ हजार रुपये देण्यास तो टाळाटाळ करीत होता. आरेफ यांनी वारंवार पैशांची मागणी केल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सोहेलने आरेफ यांना फोन केला. २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता जालना रोडवरील राधे-राधे चहाच्या हॉटेलसमोर ये, तेथे पैसे देतो, असे त्याने सांगितले. त्यानुसार आरेफ रात्री बाराच्या सुमारास तेथे पोहोचले. मात्र, सोहेल न आल्याने ते त्याची वाट पाहत थांबले.

दरम्यान, रात्री साडेबारा वाजता सोहेल खान हा साजिद शेख आणि सुलतान शेख यांच्यासह तेथे आला. तिघांनी आरेफ यांना शिवीगाळ करीत तेरे काहेके पैसे? असे म्हणत लोखंडी पाईपने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या पायाच्या नळगीला जखम होऊन रक्तस्राव झाला. तसेच डोळा आणि डाव्या खांद्यालाही मार लागला. त्यानंतर आरेफ तेथून निघाले असता तिघांनी पुष्पा गार्डनसमोर पुन्हा त्यांना मारहाण केली आणि तेथून पळ काढला. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार साहेब खान पठाण करित आहेत.

हे सुद्धा वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: गॅरेज चालकाला मारहाण का करण्यात आली?

    Ans: आरेफ मंसुरी यांनी सोहेल खान याला एक लाख रुपये हातउसने दिले होते. त्यापैकी ६ हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित ९४ हजार रुपये मागितल्याच्या वादातून मारहाण करण्यात आली.

  • Que: गॅरेज चालकाला मारहाण कुठे आणि कधी झाली?

    Ans: १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चिकलठाणा रोडवरील पुष्पा गार्डनसमोर ही घटना घडली.

  • Que: मारहाण करणारे आरोपी कोण आहेत?

    Ans: सोहेल सलमान खान, साजिद शेख आणि सुलतान शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident involving the assault of a young man has taken place in sambhajinagar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sambhajinagar Crime

संबंधित बातम्या

Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!
1

Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?
2

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…
3

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…
4

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.