Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओतूरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रावर थरार; वर्गात घुसून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

ओतूरमधील गाडगे महाराज परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू असताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 17, 2026 | 12:05 PM
ओतूरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रावर थरार; वर्गात घुसून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

ओतूरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रावर थरार; वर्गात घुसून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

Follow Us
Follow Us:

ओतूर : पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील गाडगे महाराज परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू असताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून, त्याने प्रसंगावधान राखून वार हातावर झेलल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार रोजी दहावीचा इतिहास विषयाचा पेपर होता. ओतूर येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थी गाडगे महाराज परिसरातील परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी वेळेत पोहोचला होता. सर्व विद्यार्थी आपापल्या बाकावर बसून परीक्षेची तयारी करत असतानाच, अचानक एक १७ वर्षीय अनोळखी मुलगा वर्गात शिरला. कोणाला काही समजण्याच्या आतच त्याने आपल्या दप्तरातून धारदार कोयता बाहेर काढला आणि संबंधित विद्यार्थ्याच्या दिशेने जोराने वार केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला. मात्र, ज्याच्यावर हल्ला झाला त्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने जराही न डगमगता कमालीचे धैर्य दाखवले. समोरून येणारा वार थेट शरीरावर होऊ नये यासाठी त्याने आपला हात मध्ये घातला. कोयत्याचा वार हातावर बसल्याने तो जखमी झाला, मात्र या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. वर्गातील इतर विद्यार्थी आणि पर्यवेक्षक या प्रकाराने भयभीत झाले होते.

वर्गात आरडाओरडा आणि गोंधळ सुरू होताच केंद्र प्रमुख संपत माने आणि इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या वर्गाच्या दिशेने धाव घेतली. “आम्ही आमचे कामकाज पाहत असताना अचानक जोरात आवाज झाला. आम्ही तातडीने तिथे पोहोचून जखमी विद्यार्थ्याची सुटका केली आणि हल्ला करणाऱ्या मुलाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले,” अशी माहिती केंद्र प्रमुख माने यांनी दिली.

ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेमुळे तो मानसिक धक्क्यात असतानाही त्याने जिद्द सोडली नाही. केंद्र प्रमुखांनी त्याला धीर दिला आणि नियमानुसार त्याला ‘रायटर’ (लेखनिक) उपलब्ध करून देण्यात आला. या मदतीच्या जोरावर त्याने आपला इतिहासाचा पेपर पूर्ण केला. त्याच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

परीक्षा केंद्रासारख्या सुरक्षित ठिकाणी कोयता घेऊन एखादा मुलगा वर्गात शिरतोच कसा? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शाळा आणि परीक्षा केंद्रांच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आणि पालकांनी केली आहे. सध्या ओतूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

हे सुद्धा वाचा : Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर

Web Title: A shocking incident of an attack on a student has taken place in otur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
2

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
3

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.