Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

प्रेमाच्या चौकडीत वादविवाद होऊ लागल्यानंतर आईच्या प्रियकराकडून येणारा दबाव व सतत होणाऱ्या हस्तक्षेपानंतर मुलीच्या प्रियकराने साथीदारांसोबत आईच्या त्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 14, 2026 | 12:58 PM
खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:
  • आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून
  • धक्कादायक कारणही आलं समोर
  • काळेपडळमधील घटनेनं मोठी खळबळ
पुणे : प्रेमाच्या चौकडीत वादविवाद होऊ लागल्यानंतर आईच्या प्रियकराकडून येणारा दबाव व सतत होणाऱ्या हस्तक्षेपानंतर मुलीच्या प्रियकराने साथीदारांसोबत आईच्या त्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा प्रियकर कुख्यात गुन्हेगार असल्याचेही समोर आले असून, काळेपडळ पोलिसांनी मुख्य आरोपी याच्यासह सहा जणांना अटक केली आहे.

 

दुर्वांग उर्फ पारस सुनिल मानकर (वय २१, रा. स्वारगेट), पारस किशोर गायकवाड (वय २१), अभि उर्फ अभिजीत संजय इंगळे (वय २२), साहील सागर शेलार (वय २४, रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. कात्रज), सुरज रमेश दोरकर (वय २१, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याघटनेत गणेश संजु बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) याचा खून झाला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे तसेच पोलिस अंमलदार निलेस देसाई, प्रतिक लाहिगुडे, अतुल पंधरकर तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य आरोपी दुर्वांग मानकर आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पुर्वीचे पाच गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, दुर्वांग याचे एका मुलीशी प्रेम संबंध होते. तर, मयत गणेश बिरादार याचे दुर्वांग याच्या प्रेयसी असलेल्या मुलीच्या आईसोबत संबंध होते. गणेश हा विवाहित होता. दरम्यान, गणेश हा दुर्वांगच्या प्रेयसीला दुर्वांगसोबत रिलेशनमध्ये राहू नको असे म्हणत होता. तो स्वत:च्या प्रेयसीला म्हणजे दुर्वांगच्या प्रेयसीच्या आईलाही याबाबत सतत सांगत होता. यावरून गणेश व दुर्वांग यांच्यात वाद देखील झाले होते.

दुर्वांग गणेशला प्रेयसीला व तिच्या आईला काहीही न बोलण्याचे सांगत होता, तरीही तो सांगत होता. यावरून एक वेळा पुन्हा वाद झाला. गेल्या आठवड्यात गणेश हा काळेपडळमध्ये येऊन जात असताना आरोपींनी त्याला अडवून त्याचा सिमेंटचे गट्टे डोक्यात घालून निर्घुन खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून त्यांना अटक केली.

हे सुद्धा वाचा : दिल्लीत पुन्हा निर्भया कांड! वेळ विचारण्याचा बहाणा अन् थेट बसमध्ये ओढलं; धावत्या बसमध्ये महिलेवर दोन तास सामूहिक अत्याचार

Web Title: A shocking incident of murder of a young man has taken place in kalepadal pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल
1

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…
2

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
3

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
4

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.