Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

एकतर्फी प्रेमातून एका विवाहितेचा विनयभंग करत तिच्या पतीला मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना नाशिकमधील दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 08, 2026 | 01:37 PM
तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर...; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर...; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

नाशिक : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एकतर्फी प्रेमातून एका विवाहितेचा विनयभंग करत तिच्या पतीला मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना नाशिकमधील दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दिगंबर आंधळे हा गेल्या एक ते दीड महिन्यापासून पीडित विवाहितेचा सतत पाठलाग करून तिला त्रास देत होता. काही दिवसांपूर्वी त्याने महिलेच्या कामाच्या ठिकाणी जाऊन “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत प्रेमाची मागणी घातली होती. त्यावेळी पीडित महिलेने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, “तू माझी झाली नाहीस तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही,” अशी धमकी त्याने दिली होती. पीडितेने या धमकीकडे दुर्लक्ष केले.

मात्र, सोमवारी सायंकाळच्या सुमारास संशयिताने थेट पीडितेचे घर गाठले. तेथे जाऊन त्याने पीडितेच्या पतीला “तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा. नाहीतर तुझ्या पत्नीवर आणि मुलावर अॅसिड हल्ला करेन किंवा त्यांचा अपघात घडवून आणेन,” अशी थेट धमकी दिली. पतीने या प्रकाराबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने पतीला मारहाण केली आणि पीडित महिलेचा विनयभंग केला आहे.

हे सुद्धा वाचा : ‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

सांगलीमध्ये इंजिनिअरिंगच्या 20 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे सांगली हादरले. विद्यार्थिनीच्या दोन मित्रांनीच हे भयंकर कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी दिली. तिने न घाबरता पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली तर दुसऱ्याचा शोध घेत आहेत.

Web Title: A shocking incident of the molestation of a woman has occurred in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले
1

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या
2

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या
3

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
4

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.