Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहाय्यक आयुक्ताच्या नावाने इसमाने केली लोकांची फसवणूक! फसवणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

ऐरोलीत राहणाऱ्या एका इसमाने आपण मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनर तसेच, राज्य शासनाच्या विविध मोठ्या पदांवर असल्याचे सांगून, लोकांची फसवणूक केली आहे. यामध्ये रबाळे पोलिसांनी डॅनियल वाघमारे याला अटक केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 28, 2025 | 02:44 PM
सहाय्यक आयुक्ताच्या नावाने इसमाने केली लोकांची फसवणूक! फसवणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
Follow Us
Follow Us:

सावन वैश्य | नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक गुन्हे उघड होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता ऐरोलीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐरोलीत राहणाऱ्या एका इसमाने आपण मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनर तसेच, राज्य शासनाच्या विविध मोठ्या पदांवर असल्याचे सांगून, लोकांची फसवणूक केली आहे. यामध्ये रबाळे पोलिसांनी डॅनियल वाघमारे याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या जवळून विविध शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्र आणि बनावट पासपोर्ट देखील जप्त केला आहे.

Beed Crime: संतापजनक! जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींना लोखंडी पाईपने बेदम मारहाण; बीड येथील घटना

डॅनियल वाघमारे हा ऐरोली सेक्टर 14 मधील सप्तशृंगी सोसायटीत रहायला आहे. डॅनियल हा गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आपण परराष्ट्र मंत्रालयात मोठ्या पदावर कामाला आहे, तसेच शासकीय यंत्रणेतील विविध विभागात मोठ्या पदावर काम करत आहे. असे सांगून नागरिकांची फसवणूक करत होता. याबाबतची तक्रार रबाळे पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, यांनी गोपनीय पथकातील अंमलदार अनिल मोटे आणि ललित महाजन यांना या तोतया अधिकाऱ्याचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. 

त्यानुसार दोन्ही अंमलदारांनी रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील कानाकोपऱ्यातील खोबर काढून आरोपीचा शोध घेऊन आरोपी डॅनियल वाघमारे याला ताब्यात घेतले. डॅनियल याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्या घरातून केंद्र शासनाचे तसेच राज्य शासनाचे विविध विभागाचे अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र, तसेच बनावट पासपोर्ट मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले, त्याचबरोबर आरोपी वाघमारे याच्या घरी टेलरची एक चिठ्ठी सापडली. 

Chattisgarh crime: जन्मदात्या आईचे कुऱ्हाडीने वार करत तुकडे- तुकडे केले, नंतर मृतदेहाच्या शेजारी बसून गाणे गायले, छत्तीसगड हादरलं!

त्यात खाकी रंगाचा कपडा स्टेपलर केला असल्याचा आढळून आलं. पोलिसांनी संबंधित टेलर चौकशी केली असता, आरोपीने दोन दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकाऱ्यांसारखा ड्रेस शिवाय टाकला असल्याची माहिती मिळाली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॅनियल वाघमारे या इसमाने आणखी कोणाची फसवणूक केली असेल, तर त्यांनी रबाळे पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: A thief cheated people in the name of an assistant commissioner in airoli the fraudster was arrested by the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Airoli
  • crime
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
1

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
2

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
4

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.