Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

अकलुज येथील पीडित महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक व मानसिक छळ, धमक्या, बरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 12, 2025 | 12:14 PM
धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

Follow Us
Follow Us:

अकलुज : राज्यासह देशभरातील महिलांवरील छळाच्या उऩेक घटना घडत आहेत. गेल्या काही महिन्याखाली वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. अशातच आता आणखी एक धक्कादायक प्रकार अकलूजमधून उघडकीस आला आहे. अकलुज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अकलुज येथील पीडित महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक व मानसिक छळ, धमक्या, बरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत.

फिर्यादी महिलेच्या जबाबानुसार, तिचे लग्न २ मार्च २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील मंगल कार्यालयात प्रविण गजांकुश याच्यासोबत झाले. परंतु लग्नानंतर केवळ काही दिवसातच तिच्या पतीसह सासरकडून पाच लाख रुपये व दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र माहेरहून आणण्याची मागणी सुरु झाली. या मागणीला नकार दिल्यानंतर तिला वारंवार उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि दमदाटी करण्याचे प्रकार घडले.

फिर्यादीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, पती प्रविण तसेच सासू सुनिता, दीर प्रशांत, जाऊ गौरी, नणंद साक्षी व तिचा पती सुहास यांनी संगनमत करून वारंवार पैशाची मागणी केली. इतकेच नव्हे तर, पती प्रविणने तिला माहेरी अकलुज येथे आणून भावंडांकडून पैसे आणण्यास भाग पाडले. तिच्याकडून पूर्वी ४ लाख ६३ हजारांहून अधिक रक्कम घेण्यात आल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, महिलेच्या जबाबानुसार सासरच्यांनी तिला मुंबई व रायगड येथे नेऊन घरात डांबून ठेवले. त्यावेळी तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात आले. नकार दिल्यानंतर तिचे हातपाय बांधणे, केस कापले, शॉर्ट कपडे घालण्यास भाग पाडणे आणि सतत प्राणघातक धमक्या देणे अशा अमानुष प्रकारांना तिला सामोरे जावे लागले.

फिर्यादीने आपल्या जबाबात स्पष्ट केले की, आरोपींच्या तावडीत असताना तिला पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची संधी मिळाली नाही. तिचा मोबाईल काढून घेण्यात आला होता. माहेरहून फोन आल्यास स्पीकरवरच बोलण्याचा बंधनकारक नियम तिला पाळावा लागत होता. त्यामुळे बराच काळ तक्रार नोंदवता आली नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीकडे फोन कॉल रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि आर्थिक व्यवहारांची पुरावे असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे अकलुज, सातारा व रायगड परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी आरोपींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Web Title: A woman from akluj has made serious allegations against her in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • Akluj
  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
3

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
4

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.