Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्लामपूर येथील महिलेची फसवणूक; गुंतवणुकीचे आमिष दाखवून 35 लाखांना घातला गंडा

मासेमारी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने इस्लामपूर येथील महिलेची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2025 | 02:52 PM
सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्...

सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्...

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या
  • इस्लामपूर येथील एका महिलेची फसवणूक
  • मासेमारी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून घातला गंडा
इस्लामपूर : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज चोरटे वेगवेगळे आमिष दाखवून नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी नपडण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून केले जात आहे मात्र फसवणुकीच्या घटना थांबताना दिसून येत नाही. अशातच आता इस्लामपुरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. मासेमारी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने इस्लामपूर येथील महिलेची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी दापोली तालुक्यातील दांपत्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुक्ताई दत्ताराम चोगले, दत्ताराम नामदेव चोगले (रा. पाजपंढरी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आशाराणी शिवाजी पाटील (वय ४९, रा. इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. २३ नोव्हेंबर २०२३ ते २९ एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दोन वर्षापूर्वी आशाराणी व त्यांचे पती शिवाजी दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे फिरायला गेले होते. तेथे त्यांची ओळख मुक्ताई व दत्ताराम यांच्याशी झाली. या ओळखीतून त्यांचे कौटुंबिक आणि विश्वासाचे संबंध निर्माण झाले. चोगले दांपत्याने आपला मासेमारीचा व्यवसाय असून, बोटीचा परवानाही असल्याचे पाटील यांना सांगितले. तुम्ही या व्यवसायात पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला आर्थिक फायदा मिळेल, असे आमिष दाखवले. बोटीसाठी ३५ लाख रुपये लागतील, असे सांगून त्या बदल्यात दोन वर्षांपर्यंत दर महिन्याला २ लाख रुपये देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

इस्लामपूर येथून आशाराणी यांनी नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ या महिन्यात बोटीच्या जाळ्यासाठी १५ लाख रुपये चोगले दांपत्याला दिले. त्यानंतर पतसंस्थेचे कर्ज काढून आणखी २० लाख रुपये दिले. एप्रिल २०२४ मध्ये दोघांच्या व्यवहाराचे करारपत्र करण्यात आले. त्या करारानुसार, चोगले यांनी महिन्याला २ लाख रुपये देण्याचे लेखी मान्य केले होते. काही दिवसांनी चोगले यांनी आशाराणी यांचे फोन घेणे बंद केले. संशय आल्याने आशाराणी व त्यांचे पती हर्णे बंदर येथे गेले. तेथे चौकशी केली असता चाैगले दांपत्य निघून गेल्याचे समजले.

खोटी कागदपत्रे दाखवून दिशाभूल

चोगले याने बोट चालवण्याचा परवाना व १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील करारपत्राचा फोटो पाटील यांच्या मोबाईलवर पाठवला. बोटीचा परवाना मिळाला आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, ठरल्याप्रमाणे पैसे देऊ, असे संशयित सांगत होते. आशाराणी हर्णे बंदर येथे गेल्यानंतर चोगले दांपत्याने खोटी कागदपत्रे पाठवल्याचे समोर आले. चोगले यांनी आणखी दोघांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

Web Title: A woman from islampur was cheated by being shown the lure of investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • Islampur Crime
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: सिन्नरमध्ये ४० लाखांची फसवणूक! माजी संचालकांच्या धनादेशाचा गैरवापर, खोट्या सह्या करून काढले कर्ज
1

Nashik Crime: सिन्नरमध्ये ४० लाखांची फसवणूक! माजी संचालकांच्या धनादेशाचा गैरवापर, खोट्या सह्या करून काढले कर्ज

Hyderabad Airport Bomb Threat:  हैदराबाद विमानतळाला पुन्हा बॉम्बची धमकी; २३ दिवसांत चौथी घटना
2

Hyderabad Airport Bomb Threat: हैदराबाद विमानतळाला पुन्हा बॉम्बची धमकी; २३ दिवसांत चौथी घटना

टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जणांना घेतले ताब्यात
3

टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जणांना घेतले ताब्यात

Kolhapur News : कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; कराडमध्ये व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक
4

Kolhapur News : कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; कराडमध्ये व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.