Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई

भारती विद्यापीठ येथील दत्‍तनगरमधील चंद्रभागा चौकात 'योग आयुर्वेदिक पोटली मसाज' सेंअरच्‍या नावाखाली सुरू असलेल्‍या वेश्या व्यावसायावर गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने छापेमारी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2026 | 12:30 AM
पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : भारती विद्यापीठ येथील दत्‍तनगरमधील चंद्रभागा चौकात ‘योग आयुर्वेदिक पोटली मसाज’ सेंअरच्‍या नावाखाली सुरू असलेल्‍या वेश्या व्यावसायावर गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने छापेमारी केली आहे. छापा कारवाईत पोलिसांनी येथून पाच मुलींची सुटका केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १४३(१)(३), ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छगन कापसे, पोलिस अमंलदार आंधळे, भिवरकर, जाधव, नदाफ, भुजबळ यांच्‍या पथकाने केली आहे.

पुणे शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात आहे. हे प्रकार सातत्याने सुरू असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला भारती विद्यापीठ परिसरातातील व्यंकटेशम ब्लॉसम सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्‍यावर योग आयुर्वेदिक पोटली मसाज सेंटरच्‍या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू असल्‍याची माहिती मिळाली होती. या माहितीची बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पथकाने याठिकाणी छापा कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पाच मुलींची सुटका केली. तर, मसाज सेंटर चालकासह तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

हे सुद्धा वाचा : एक फ्लॅट, दोन मित्र आणि विचित्र अट; अमरावती सेक्स स्कँडलचा पर्दाफाश, एकाच ठिकाणी व्हिडिओ शूटचा धक्कादायक प्रकार समोर

बारामतीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

गेल्या काही दिवसाखाली बारामती-भिगवण रोडवरील अमृता लॉज (सोमनाथ हॉटेल) येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे ३ च्या वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक राम हरी भोसले यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. पंचांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक अमृता लॉजवर धाड टाकली. छाप्यादरम्यान काही ठिकाणी महिला व ग्राहक एकत्र आढळून आले. चौकशीदरम्यान संबंधित आरोपी हे बाहेरून महिलांना आणून त्यांना ग्राहकांना पुरवत असल्याचे उघड झाले. ग्राहकांकडून पैशांची वसुली करत असल्याचेही समोर आले. या प्रकरणात अजित जयसीन शेट्टी (वय ३८, हॉटेल चालक) व चाँद कलाम आलम (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत पश्चिम बंगाल येथील ३, भिवंडी मुंबई येथील २ अशा ५ महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

Web Title: Pune police has taken major action by raiding a massage center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.